मला सलमानची कमेंट आवडली नाही… दबंग स्टारवर का भडकली दिग्दर्शक कबीर खानची पत्नी ?

"अलायन्स" शोची विजेती मिनी माथुरने सलमान खानच्या तिच्याबद्दलच्या कमेंटवर नाराजी व्यक्त केली आहे. सलमान म्हणाला होता की, "कबीर खान तिच्या पत्नीला का घाबरतो हे आता कळले." मिनीने नमूद केले की, तिला कबीर खानची पत्नी म्हणून ओळखण्याऐवजी स्वतःची वेगळी ओळख हवी आहे.

| Updated on: Sep 21, 2026 | 3:02 PM
1 / 8
दिग्दर्शक कबीर खानची पत्नी  आणि अभिनेत्री मिनी माथुर ही नुकतीच कुणाल खेमूच्या अलायन्स या रिॲलिटी शोची विजेती ठरली.  शोमध्ये तिचा गेम आणि स्ट्रॅटेजी जबरदस्त मजबूत होती, तिला विजय मिळताच प्रेक्षकांनाही खूप आनंद झाला. ( All Photos : Social Media)

दिग्दर्शक कबीर खानची पत्नी आणि अभिनेत्री मिनी माथुर ही नुकतीच कुणाल खेमूच्या अलायन्स या रिॲलिटी शोची विजेती ठरली. शोमध्ये तिचा गेम आणि स्ट्रॅटेजी जबरदस्त मजबूत होती, तिला विजय मिळताच प्रेक्षकांनाही खूप आनंद झाला. ( All Photos : Social Media)

2 / 8

या शोच्या फिनालेपूर्वी अभिनेता सलमान खान हाही या शोमध्ये आला, या शोमध्ये त्याचा भाऊ सोहेल खान सहभागी झाला होता, सलमानने त्याची भेट घेतली. त्यावेळी दबंग स्टारने घरातल्या सर्वांशी संवाद साधला. त्यावेळी सलमानने मिनी माथुरासाठी एक कमेंट केली.

3 / 8

दिग्दर्शक कबीर खान त्याच्या पत्नीला एवढा का घाबरतो हे आता मला कळलंय असा सलमान मिनीशी बोलताना म्हणाला. अलायन्सचा हा गेम पाहून सलमान खानने ही कमेंट केली होती.

4 / 8

आता हो शो संपून बराच काळ झाल्यावर मिनीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. नयनदीप रक्षितच्या यूट्यूब चॅनेलवर संवाद साधताना मिनीने नाराजी व्यक्त केली. मला तो ( सलमान खान) खूप आवडतो, पण त्याची ती कमेंट मला आवडली नाही, असं मिनीने म्हटलं.

5 / 8

कबीर खानची पत्नी म्हणून झालेल्या उल्लेखावरही मिनी माथूर स्पष्टपणे बोलली. बऱ्याच काळापासून लोकं मला कबीरची पत्नी म्हणून ओळखतात, पण अलायन्स शो दरम्यान सलमानने तिची एक वेगळं व्यक्तीमत्व म्हणून, वेगळी ओळख पाहील, याचा तिला आनंद झाल्याचं मिनीने नमूद केलं.

6 / 8

दरम्यान या शोमध्ये सलमानची एंट्री झाल्यावर घरच्यांच्या प्रतिक्रियेवरही मिनीने कमेंट केली. त्याला पाहून सगळेच थक्क झाले होते. सलमान आपल्यासोबत बसून कॉफी पितोय, यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता, असं ती म्हणाली.

7 / 8

सलमान खानच्या बाबतीत बोलायचं झालं, तर आजकाल तो सोशल मीडियावर दुसऱ्या कारणासाठी व्हायरल होत आहे. शनिवारी बिग बॉसमधील वीकेंड का वारमध्ये सलमानने ऑनलाइन बॉडी शेमिंग आणि ट्रॉलिंगवर प्रतिक्रिया दिली होती. बोलताना बोलताना सलमानने कटरीना कैफची बाजू घेतली.

8 / 8

टोल्स आणि पापराझींवर रागावलेल्या सलमानने आपली टी-शर्ट आणि टोपीही काढली होती. आता मला कोणी ट्रोल करू दाखवा, असं आव्हानंही त्याने दिलं. या गोष्टीसाठी त्याचं बरंच कौतुक झालं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us