
प्रामाणिकपणा आणि शिस्त - चाणक्य नीतीनुसार, यशस्वी करिअरसाठी प्रामाणिकपणा आणि शिस्त आवश्यक आहे. जो माणूस या दोन गोष्टींच्या आधारे जागतो त्याला आयुष्यात कमी अडचणी येतात.

चांगली वागणूक - चाणक्य नीतीनुसार आयुष्यात यश मिळवण्यासाठी व्यक्तीचे वर्तन चांगले असले पाहिजे. ज्या व्यक्तीची वाणी चांगली असते तो प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो.

जोखीम घेणारा - व्यक्ती नेहमी जोखीम घेण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. चाणक्य नीतीनुसार, जे लोक धोका पत्करतात त्यांना त्यांच्या करिअरमध्ये नक्कीच यश मिळते.

टीमवर्क - चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीला कधीही एकट्याने यश मिळत नाही. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी सांघिक काम करण्याची वृत्ती असली पाहिजे. जो सर्वाना सोबत घेऊन चालतो, तो काम चांगल्या प्रकारे पूर्ण करतो. उद्योगपती टाटाचे एक वाक्य आहे चर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहचायचे असेल तर एकटे चाला पण जर तुमची ध्येय मोठी असतील तर एकत्र चाला.

सामर्थ्य - चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने आपल्या क्षमतांची जाणीव ठेवली पाहिजे. माणसाने नेहमी त्याच्या क्षमतेनुसार काम केले पाहिजे. तसे न केल्यास भविष्यात नुकसान होऊ शकते.