
प्रेमानंद महाराज नेहमी सांगतात की जीवनात खरे समाधान फक्त ईश्वरभक्तीतून मिळते. “नाम जपा, रामाचा, कृष्णाचा किंवा तुमच्या आराध्य देवाचा — पण मन लावून जपा. नामस्मरनात परमसत्य आहे... असं महाराज सांगतात.

अहंकार म्हणजे आत्मज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू आहे... आपण जे काही करतो ते ईश्वराच्या कृपेने आहे, असे मानल्याने नम्रता आणि शांती प्राप्त होते. कधीत मी पणा जीवनाक आणू नका... अहंकार सर्वात मोठी शत्रू आहे...

सदाचार आणि करुणा देखील फार महत्त्वाची गोष्ट आहे... महाराज सांगतात, खरा साधक तोच जो प्रेम, करुणा आणि सत्याने जीवन जगतो. इतरांशी प्रेमाने वागणे, प्राणिमात्रांवर दया ठेवणे आणि सत्य बोलणे हेच खरे धर्माचे आचरण आहे.

मनशांतीसाठी आत्मचिंतन फार गरजेचं आहे... प्रेमानंद महाराज सांगतात की मनावर नियंत्रण हेच साधनेचे मूळ आहे. दररोज काही वेळ स्वतःकडे पाहा, ध्यान करा, आपले विचार शुद्ध करा... तेव्हा नक्कीच शांती मिळते.

साधुसंवादाचे महत्त्व फार आहे... महाराज म्हणतात, “संतांचा संग म्हणजे आत्म्याची उन्नती.” संतांच्या संपर्कात राहिल्याने आपल्यातील दोष नष्ट होतात आणि आत्मज्ञानाकडे वाटचाल सुरू होते. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)