
ई-कॉमर्स वेबसाईट Amazon आणि Flipkart वर वर्षांचा पहिला सेल सुरु झाला आहे.'रिपब्लिक डे' सेल मध्ये तुम्हाला ६ हजाराहून कमी किंमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.या दोन्ही प्लॅटफॉर्मवर अनेक ब्रँड्सचे स्मार्ट टीव्ही तुम्हाला खुपच स्वस्तात मिळणार आहे. तुमचे बजेट कमी असले तरीही अनेक शानदार स्मार्ट टीव्हीचे पर्याय आहेत.

Thomson Alpha स्मार्ट टीव्हीला तुम्ही अगदी ५,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करु शकता. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर हा स्मार्ट टीव्ही ३०० रुपये स्वस्तात मिळणार आहे. याची किंमत ६,२९९ रुपये आहे.हा २४ इंच स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही Jio Tele OS आणि बेजललेस डिझाईनसह येत आहे.

जर तुम्हाला मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर यासाठी तुम्हाला ८,४९९ रुपये खर्च करावे लागणार आहेत. Thomson Alpha सीरीजच्या ३२ इंची स्क्रीनवाले हे स्मार्ट टीव्ही खूपच स्वस्तात मिळत आहेत.या स्मार्ट टीव्हीला तुम्ही फ्लिकार्टवरुन खरेदी करु शकता.

Kodak कंपनीचा OLED स्मार्ट टीव्हीला तुम्ही ८,४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करु शकता. हा स्मार्ट टीव्ही ३२ इंचाची स्क्रीनमध्ये येते. याशिवाय टीव्हीच्या खरेदीवर १,००० रुपयांचा बँक डिस्काऊंटमध्ये मिळत आहेत. या प्रकारे या स्मार्ट टीव्हीला आणखी स्वस्तात घरी आणू शकता.

Acer चे 32 इंचाचे स्मार्ट टीव्हीला ९,९९९ रुपयात खरेदी करु शकतात.Amazon वर चालू असलेल्या रिपब्लिक डे सेल मध्ये एसरचा स्मार्ट टीव्ही ८,९९९ रुपयात मिळू शकतो. टीव्ही खरेदीवर १,००० रुपयांचा बँक डिस्काऊंट ऑफर केली जात आहे.