
आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणजे अंबानी फॅमिली. रिपोर्ट्सनुसार, अंबानी कुटुंबाची एकूण संपत्ती 113.5 बिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे. देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या अंबानी कुटुंबाची लाईफस्टाइल राजा-महाराजांपेक्षा कमी नाही. मुकेश अंबानी , नीता अंबानीपासून ते घरच्या सूनबाई श्लोका, राधिका मर्चंट या सर्वांची रास कोणती आहे ते आज आपण जाणून घेऊया. (Photos : Social media/ Instagram)

मुकेश अंबानी - रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा जन्म 19 एप्रिल 1957 साली झाला. त्यांची रास मेष ही आहे. या राशीचे लोक हे साहसी, प्रामाणिक , मनमिळाऊ आणि हसतमुख असतात. त्यांच्यात नैसर्गिक नेतृत्वगुण असतात आणि आव्हानांवर मात करण्याची त्यांची इच्छा असते.

नीता अंबानी - मुकेश अंबानी यांची पत्नी , नीता अंबानी यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1963 साली झाला. त्यांची रास वृश्चिक आहे. वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या तीव्र स्वभावासाठी, आवडीसाठी, अंतर्ज्ञानासाठी आणि दृढनिश्चयासाठी ओळखले जातात. ते इतरांकडून आदर आणि प्रशंसा मिळवतात.

आकाश अंबानी - आकाश अंबानी याचा जन्म 23 ऑक्टोबर 1991 साली झाला. तो सध्या 34 वर्षांचा असून त्याचीही रास आईप्रमाणेच वृश्चिक आहे. तो मुकेश व नीता यांचा मोठा मुलगा आहे. या राशिचे लोक साधे असतात आणि त्यांची लोकांशी लवकर मैत्री होते.

श्लोका मेहता - आकाश अंबानी याची पत्नी श्लोका मेहता हिचा जन्म 11 जुलै 1990 साली झाला. अंबानी कुटुंबाच्या मोठ्या सुनेची रास आहे कर्क. या राशीचे लोक मेहनती, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय असतात.

ईशा अंबानी - अंबानी कुटुंबाची लाडकी मुलगी ईशा हिचा जन्मही 23 ऑक्टोबर 1991 साली झाला. ईशा आणि आकाश हे दोघे जुळे भाऊ-बहीण आहेत. ईशाची रासही वृश्चिक आहे. या राशीखाली जन्मलेल्या मुली खूप भावनिक असतात.

आनंद पीरामल - अंबानी कुटंबाचा जावई म्हणेच इशा अंबानी हिचा पती, आनंद पीरामल याचा जन्म 25 ऑक्टोबर 1984 साली झाला. त्याची रास मीन आहे. या राशीचे लोक संवेदनशील, दयाळू, मेहनती आणि भाग्यवान असतात.

अनंत अंबानी - अंबानी कुटुंबातील धाकटा मुलगा अनंत अंबानी 10 एप्रिल 1995 साली जन्मला. त्याची रास वडिलांप्रमाणेच मेष आहे. या राशीचे लोक भावूक आणि संवेदनशील असतात.

राधिका मर्चंट - अंबानी कुटुंबातील धाकटी सून , अनंत याची पत्नी राधिका मर्चंट ही 18 डिसेंबर 1994 साली जन्मली. ती वृषभ राशीची आहे. या राशीचे लोक व्यावहारिक, स्थिर, कोमल मनाचे, शांत आणि विश्वासार्ह असतात.