
नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि अनंत अंबानी यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट दिली.

तुमच्यापैकी अनेकांनी वर्षाच्या सुरूवातीला धार्मिक यात्रेचे नियोजन केले असेल, अनेकांनी धार्मिक स्थळी जाऊन दर्शनही घेतले असेल. अशाच प्रकारे अंबानी कुटुंबियांनी सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि अनंत अंबानी यांनी सोमनाथ मंदिराला भेट देऊन वर्षाची सुरुवात श्रद्धेने केली.

यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी अंबानी कुटुंबीयांचे स्वागत केले. यानंतर मुकेश अंबानी यांनी या मंदिराला 5 कोटींचा रक्कम दान म्हणून दिली. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

अनंत अंबानी यांनी शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. साईबाबांकडे प्रार्थना करताना त्यांना साईबाबांच्या मंदिराला 5 कोटी रुपयांची देणगी दिली. दरम्यान, अंबानी कुटुंबाने याआधीही अनेक धार्मिक स्थळांना दान दिलेले आहे.