अंबानींचं घर, बकिंगहॅम पॅलेस देखील या क्रिकेटपटूच्या पत्नीच्या महालासमोर फेल, देशात सर्वात मोठं घर यांचंच

आपलं घर सुंदर आणि मोठं असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण तुम्हाला एक प्रश्न कायम पडत असेल आणि तो म्हणजे देशात सर्वात मोठं घर कोणाचं आहे. तर सर्वांना वाटत असेल की, अंबानी कुटुंबियांचं अँटेलिया सर्वात मोठं असेल. पण नाही देशाच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पत्नीचं घर सर्वात मोठं आहे. तर जाणून घ्या त्यांच्या घराबद्दल...

| Updated on: Aug 17, 2026 | 10:02 AM
1 / 6
 गुजरातमधील वडोदरा शहरात राहणाऱ्या राधिका राजे गायकवाड या देशातील सर्वात मोठ्या घराची श्रीमंत मालकिन आहे. त्या वडोदऱ्याच्या गायकवाड घराण्याच्या राणी आहेत. त्याचे कुटुंब 18 व्या शतकाच्या सुरुवातीपासून गुजरातवर राज्य करत आहे.

गुजरातमधील वडोदरा शहरात राहणाऱ्या राधिका राजे गायकवाड या देशातील सर्वात मोठ्या घराची श्रीमंत मालकिन आहे. त्या वडोदऱ्याच्या गायकवाड घराण्याच्या राणी आहेत. त्याचे कुटुंब 18 व्या शतकाच्या सुरुवातीपासून गुजरातवर राज्य करत आहे.

2 / 6

राधिका राजे त्यांच्या कुटुंबासह लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये राहतात, ज्याची किंमत 25 हजार कोटी आहे. हा पॅलेस ब्रिटनच्या किंग चार्ल्सच्या बकिंगहॅम पॅलेसपेक्षा चार पट मोठा आहे. , अंबानी कुटुंबियांचं अँटेलिया देखील त्यांच्या महालसमोर फिकं आहे.

3 / 6

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी विलास पॅलेस, ज्याला वडोदरा पॅलेस म्हणूनही ओळखलं जात. 1890 मध्ये बांधण्यात आलेला हा पॅलेस 30 लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेला आहे आणि त्याची रचना ब्रिटिश अभियंता मेजर चार्ल्स मंट यांनी केली होती.

4 / 6

राधिका राजे गायकवाड यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, स्वत: पत्रकार असलेल्या महाराणी राधिका राजे गायकवाड यांनी 2002 मध्ये महाराजा समरजित सिंग गायकवाड यांच्याशी विवाह केला. समरजीत सिंह गायकवाड हे क्रिकेटपटू होते.

5 / 6

या भव्य राजवाड्यात 170 हून अधिक खोल्या, एक खाजगी गोल्फ कोर्स आणि शाही इतिहासाने भरलेले संग्रहालय आहे. या पॅलेसच्या तुलनेत मुकेश अंबानींचे अँटिलिया 48,780 चौरस फूट आहे, तर लक्ष्मी विलास पॅलेस अँटिलियाला देखील मागे टाकतो.

6 / 6

या राजवाड्याचं विशेष म्हणजे सामान्य लोकही हा राजवाडा पाहू शकतात. फक्त150 रुपयांचं तिकीट काढून तुम्ही राजवाड्याला भेट देऊ शकता. जर तुम्हाला येथील संग्रहालय देखील पहायचे असेल तर तुम्हाला अतिरिक्त 150 रुपये मोजाले लागतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us