
अमेरिकेतील डॉक्टरांनी मोठा चमत्कार करून दाखवला आहे. मेरलँड शहरातील एक 58 वर्षीय मृत्यूच्या काठावर होती. मात्र या व्यक्तीच्या हृदयाचे प्रत्यारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे या व्यक्तीला चक्क डुकराचे हृदय लावण्यात आले आहे.

डॉक्टरांनी विज्ञानाच्या जोरावर हा चमत्कार करून दाखवला असून सध्या या व्यक्तीची प्रकृती स्थीर आहे. या रुग्णाने अगोदर अमेरिकेतील नौसेनेत नोकरी केली होती. लॉरेन्स फॉसेट असे व्यक्तीचे नाव आहे. डॉक्टरांनी त्याच्या हृदयाचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण केले आहे.

मनवाच्या शरीरात जेव्हा प्राण्यांच्या अवयवांचे प्रत्यारोपण केले जाते त्याला जेनो ट्रान्सप्लान्ट म्हटले जाते. याआधी अशाच प्रकारचा प्रयोग एका रुग्णावर करण्यात आला होता. मात्र या प्रत्यारोपणात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

डुकराचे अवयव हे मानवी शरीरात प्रत्यारोपण करण्यासाठी सर्वात योग्य असल्याचे सांगितले जाते. डुकरांचे अवयव कमी काळात जास्त वाढतात. तसेच डुकरांच्या अवयवांची रचना ही मानवाच्या अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.

नुकतेच न्युयॉर्कमध्ये एका ब्रेन डेड रुग्णाला डुकराचे मुत्रपिंड लावण्यात आले होते. नंतर या मुत्रपिंडाने 61 दिवस काम केले. नंतर मात्र त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. (या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)