Iran Israel War : भारताचा सर्वात मोठा निर्णय, युद्ध सुरू असतानाच प्लॅन बी…तेलाची टंचाई होणारच नाही!
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे भारतात इंधनाचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता भारताकडून खबरदारी म्हणून प्लॅन बीच्या अमंबलजावणीस सुरूवात करण्यात आली आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात इंधन दरवाढीचा धोका वाढला आहे. भारतालाही पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलएनजी यासाराख्या उर्जानिर्मिती करणाऱ्या घटकांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

या युद्धाचे पडसादही भारतावर पडायला सुरुवात झाली आहे. भारतात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल आहे. त्यामुळेच आता भारत सरकारने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. भारताने आता प्लॅन बीची अंमलबजावणी सुरू केली आहे.

इराणने होर्मुझची खाडी बंद केली आहे. त्यामुळे कतार तसेच इतर देशांकडून भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा होत नाहीये. एकूण गरजेच्या साधारण 40 टक्के कच्चे तेल भारत याच होर्मुझच्या खाडीतून आयात करतो. आता ही खाडीच व्यापारासाठी बंद करण्यात आल्याने भारताने दुसरा पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.

देशात इंधन तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी भारत आता अमेरिका तसेच संयुक्त अरब अमिराती यांच्याकडून कच्च्या तेलाची आयात करणार आहे. तसेच कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांकडूनही भारत नैसर्गिक वायू मागवत आहे.

सरकारच्या याच रणनीतीमुळे सध्या यद्ध चालू असले तीरीही भारताला इंधनाचा तुटवडा होणार नाही. तसेच सामान्यांना झळ बसणार नाही, असे सांगितले जात आहे. इतर देशात इंधनाचा भाव वाढायला लागला आहे. पाकिस्तानात पेट्रोलचा दर 55 टक्क्यांनी वाढला आहे.