AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे घेणार मंत्र्यांची हजेरी; बैठकीत घेऊ शकतात मोठा निर्णय

Eknath shinde : एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे घेणार मंत्र्यांची हजेरी; बैठकीत घेऊ शकतात मोठा निर्णय
| Edited By: | Updated on: Jul 28, 2026 | 7:41 AM
Share

केंद्रात धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देशासहित राज्यातही घडामोडींना वेग आला आहे. कालच MPSC चा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यात कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनामुळे विरोधक हे आधीपेक्षा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातही फेरबदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचबरोबर शिवसेना आमदारांनी मतदारसंघातील कामे होत नसल्याची तक्रारी एकनाथ शिंदे यांना केल्याची माहिती मिळत आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना सत्ताधारी अलर्ट झाले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे हे मंत्र्यांच्या कामगिरीचा सखोल आढावा घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील समिती सभागृहात होणाऱ्या या बैठकीत प्रत्येक मंत्र्यांच्या विभागाचा गेल्या दीड वर्षातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्र्यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची केवळ माहितीच नव्हे, तर त्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत झाली, याचीही तपासणी शिंदे करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबतच ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ अंतर्गत सन २०२६-२७ साठी संबंधित विभागांना देण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेचा आढावाही घेतला जाणार आहे. अनेक आमदारांनी मतदारसंघातील कामे संबंधित विभागांकडून होत नसल्याच्या तक्रारी शिंदे यांच्याकडे केल्याची चर्चा आहे. त्यानंतरच ही आढावा बैठक बोलावण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा सुरू असतानाच या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. बैठकीतील कामगिरीच्या आढाव्यानंतर कमी कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांबाबत कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व मंत्र्यांना विभागनिहाय निर्णय आणि त्यांच्या अंमलबजावणीचे अहवाल घेऊन उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्र्यांना कोणते आदेश आणि सूचना दिल्या जातात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार