AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमचा अजेंडा खुर्ची नव्हे, तर…; एकनाथ शिंदेंचे विरोधकांवर टीकेचे बाण

eknath shinde speech : एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंवर टीका केली. आम्ही फेस टू फेस काम करणारे नेते असल्याचे म्हणत टीका केली आहे.

आमचा अजेंडा खुर्ची नव्हे, तर...; एकनाथ शिंदेंचे विरोधकांवर टीकेचे बाण
| Updated on: Jul 26, 2026 | 2:32 PM
Share

एकनाथ शिंदेंची शिवसेना पुन्हा राज्यात सक्रिय होऊ पाहत आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाने शिवसेना आपल्या दारी हा कार्यक्रम लाँच केला आहे. या कार्यक्रमानिमित्त कोकणात एक जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या जाहीर सभेतून एकनाथ शिंदेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तर उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्ह करणारे नेते आहेत, अस म्हणत टीका केली. तर आमचा अजेंडा खुर्ची नव्हे, तर गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे हे दापोलातील कार्यक्रमात विरोधकांवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, ’22 ला उठाव केला, त्याची नोंद जगाने घेतली. इतिहासात अशा उठाव कधीच झाला नाही. लोकांना वाटलं, हे कोणी निवडून येणार नाही. मी त्याच सभागृहात सांगितलं होतं की, कोणी निवडून आलं नाही, तर राजकीय निवृत्ती घेईल. त्यानंतर शेती करायला जाईल. तुमच्या एकनाथ शिंदेंनी चाळीसचे साठ आमदार केले. या महाराष्ट्रातील लोकांनी स्वीकारलं. लाडक्या बहिणी, माता भगिनी, शेतकरी, वारकरी यांच्यासाठी निर्णय घेतले. अडीच वर्षात घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली. यासाठी माता-भगिनी, शेतकऱ्यांना धन्यवाद देणे जितके कमी आहे’,

‘आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करतो. आमचा अजेंडा खुर्ची नाही. तर आमचा अजेंडा सत्ता नव्हे, तर आमचा अजेंडा गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करणे , महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणे. त्यामुळे हाच अजेंडा आम्ही राबवत आहोत. आता फक्त मुंबई नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा कार्यक्रम राबवू. सरकारचे लाभ अधिक आहे. पण व्यक्तीकडे दाखले, कागदपत्रे नसतात. त्यामुळे ही कागदपत्रे महत्वाचे आहेत. मी मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवून लाभ दिले. मंत्रालयात न बोलवता लोकांकडे जाऊन लाभ देतो. दाखले वाटप, ट्रक्टर वाटप करतो. शिवसेना जनतेच्या दारी हा कार्यक्रम राबवत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

‘कुणी किती कटकारस्थान केलं तरी रामदास कदम शिवसेना पुढे घेऊन जात आहेत. कुणालाही रामदास कदम यांना झुकवण्याची हिंमत नाही. रामदास कदम यांचं भाषण दसरा मेळाव्यात बघतो. एका शेर म्हणतो, हमको मिटा सके, ये ज़माने में दम नहीं. हमसे ज़माना ख़ुद है ज़माने से हम नहीं. प्रत्येक शिवसेना अशीच आहे. त्यांचा नेता रस्त्यावर उतरून लढतो. कुठलंही संकट असो. जिथे संकट तिथे शिवसेना, आम्ही फेस टु फेस वाले आहे. फेसबुक लाईव्ह वाले नाहीत. जनतेच्या मनात आदरभावना निर्माण झाली. त्यामुळे अनेक जण शिवसेनेत येत आहेत, असे पुढे म्हणाले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार