Amrita Rao: माझ्यावर काळी जादू केली होती; अमृता रावचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावने काळ्या जादूसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. तिने सांगितले की, एका गुरुजींनी तिच्या आईला सांगितले की, कोणीतरी तिच्या मुलीवर वशीकरण केले आहे. अभिनेत्रीने स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

| Updated on: Oct 13, 2025 | 4:01 PM
1 / 6
‘विवाह’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे अमृता राव. निरागस चेहरा, सुंदर अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारी अमृता सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ‘मैं हूं ना’, ‘इश्क विश्क’ या चित्रपटांमधील दमदार अभिनयाने तिने चाहत्यांना वेड लावले होते. दरम्यान, एका पॉडकास्टमध्ये तिने सांगितले की, तिच्यावर काळी जादू करण्यात आली होती. पूर्वी ती अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हती. पण जेव्हा तिच्यासोबत असे घडले, तेव्हा ती चकित झाली. नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

2 / 6
रणवीर इलाहाबादियाने त्याच्या पॉडकास्टमध्ये अमृताला बोलावले होते. त्यावेळी त्याने काळ्या जादूसंदर्भात अमृताला प्रश्न विचारला. त्यावर अमृताने उत्तर दिले की, तो असा प्रश्न का विचारतो? तेव्हा रणवीरने सांगितले की, साधी आणि स्वच्छ मनाची माणसे डार्क साइडपासून प्रभावित होतात.

3 / 6
अमृताने तिची कहाणी सांगताना म्हटले की, एकदा ती तिच्या गुरुजींना भेटली होती. त्यांनी तिला आशीर्वाद दिला. त्यानंतर 1-2 दिवसांनी त्यांनी माझ्या आईशी बोलताना सांगितले की, कोणीतरी तुझ्या मुलीवर वशीकरण केले आहे. हे ऐकून मी थक्क झाले. जर ही गोष्ट गुरुजींव्यतिरिक्त कोणी सांगितली असती, तर मी वशीकरणासारख्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नसता.

4 / 6
ती पुढे म्हणाली, “मला माहिती आहे की, ते (गुरुजी) खरे आहेत. त्यांना काही गमावण्याची भीती नाही, किंवा काही मिळवण्याची इच्छाही नाही. त्यांनी मला फक्त सत्य सांगितले. त्यांच्या बोलण्यानंतर मला वाटले की, कदाचित माझ्यावर काळा जादू झाली असावी. याआधी मी फक्त इतर अभिनेत्रींकडून ऐकले होते की, इंडस्ट्रीत काळी जादू होते.” अमृताने सांगितले की, तिला काळी जादू जाणवली नव्हती, पण कदाचित काही नकारात्मक गोष्टी तिच्यासोबत घडल्या होत्या.

5 / 6
अमृताने एक किस्सा सांगताना म्हटले, “माझ्या आयुष्यात एक वळण असे आले जेव्हा मी 3 मोठे चित्रपट साइन केले होते. ते सर्व चित्रपट मोठ्या बॅनरचे होते. त्या वर्षी सर्वात मजेदार गोष्ट घडली, ती म्हणजे ते तिन्ही चित्रपट बनलेच नाहीत. मी साइनिंग रक्कमही घेतली होती, पण प्रोजेक्ट बंद पडले. माझ्यासाठी हे थोडे विचित्र होते.”

6 / 6
अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची ‘जॉली एलएलबी 3’ या चित्रपटात दिसली होती. कामाव्यतिरिक्त अमृता वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करते. ती तिचा पती अनमोलसोबत मिळून यूट्यूबवर पॉडकास्ट चालवते. दोघे मिळून सेलिब्रिटी जोडप्यांच्या मुलाखती घेतात. चाहते अमृताला पुन्हा पडद्यावर पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.