
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लेक अनंत अंबानी याचे प्री वेडिंग फंक्शन हे काही दिवसांपूर्वीच गुजरात येथे पार पडले. या फंक्शनला बाॅलिवूड कलाकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

आता अनंत आणि राधिक मर्चंट यांच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठे अपडेट हे पुढे आले आहे. यांचा शाही विवाहसोहळा हा विदेशात पार पडणार आहे.

जुलै महिन्यात हा विवाह लंडनमध्ये पार पडणार आहे. हेच नाही तर बाॅलिवूड कलाकारांना या विवाहसोहळ्याचे निमंत्रण पाठवण्याचे काम सुरू आहे.

स्टोक पार्कमध्ये हा विवाहसोहळा होणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. जगभरातून लोक या विवाहसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका यांचे संगीत अबूधाबीला होणार असल्याचेही रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. लोकांमध्ये या विवाहसोहळ्याबद्दल उत्सुकता बघायला मिळत आहे.