Ananya Birla House: बंगला आहे की महाल? 1770 कोटींची मालकीण असलेल्या अनन्या बिरलाचे घर पाहिलेत का?

Ananya Birla luxury House: 1770 रुपयांची मालकीण असलेली अनन्या बिरला ही कायम चर्चेत असते. नुकताच तिच्या आलिशान घराची झलक समोर आली आहे. तुम्ही पाहिलीत का?

| Updated on: Nov 19, 2026 | 9:38 AM
1 / 6
बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर, फिल्ममेकर फराह खान सध्या आपल्या युट्यूब व्ह्लॉगद्वारे सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची आणि त्यांच्या घरांची झलक दाखवत असते. ती नुकताच प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिरला यांच्या मुली, गायिका आणि उद्योजिका अनन्या बिरला यांच्या मुंबईतील भव्य घरी पोहोचली.

2 / 6

अनन्या बिरला ही 1770 कोटी रुपयांची मालकीण आहे. त्यामुळे तिच्या लग्झरी आयुष्याची कायमच चर्चा सुरु असते. नुकताच फराहने अनन्याच्या घराची झलक दाखवली. तिचे घर हे एखाद्या राजवाड्यासारखे असल्याचे दिसत आहे.

3 / 6

अनन्या बिरलाच्या घराची भव्यता, अप्रतिम इंटीरियर, मौल्यवान कलाकृती आणि जुन्या काळातील इंटिरिअर पाहून फराही थक्क झाली. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लक्झरी आणि क्लासिक डिझाइनचे असे मिश्रण दिसले आहे.

4 / 6

अनन्याच्या संपूर्ण बंगल्यात वॉर्म लाइट, वुडन फर्निचर असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

5 / 6

अनन्याच्या घरातील स्वयंपाक घर हे आधुनिक आहे. फिकट हिरव्या रंगाचे इंटिरिअर आणि पांढऱ्या रंगासोबत अतिशय सुंदर दिसत आहे.

6 / 6

सध्या सोशल मीडियावर अनन्या बिरलाच्या घराची जोरदार चर्चा सुरु आहे. तिचे आलिशान घर पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us