
शासनाने या पुरातन वास्तूचे जतन आणि संवर्धन करावे, या वास्तूवर संशोधन व्हावे तसेच त्याला पर्यटनाचा दर्जा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

इटलीतील जगप्रसिद्ध 'पिसाच्या झुकत्या मनोऱ्या' प्रमाणेच, एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथे दोन अद्भुत झुलते मनोरे प्रसिद्ध असून तब्बल 500 वर्ष पुरातन ही वास्तू आहे

एक मनोरा हलवल्यास दुसरा मनोराही हलतो! असे या मनोऱ्यांचे वैशिष्ट्य असून मनोऱ्यांची स्थापत्यकला आजही संशोधकांसाठी एक गूढ आहे. मात्र सरकारी दुर्लक्षामुळे 1991 मध्ये यापैकी एक मनोरा कोसळला, तर दुसरा अजूनही तग धरून आहे

देशात एकमेव असल्याने पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी होत होती. विदेशी पर्यटक सुद्धा या ठिकाणी भेटी देत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ग्रामपंचायत गावातील ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या पाठपुरावाला यश आलं असून आता ही पुरातन वास्तू पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

दिल्ली, पुणे, छत्रपती संभाजीनगर तसेच नाशिक येथील येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी फरकांडे गावात येऊन भेटी देत वास्तूची पाहणी केली.

पुरातत्व विभागाकडून या पुरातन वास्तूच्या दुरुस्तीसह नूतनीकरणाचे जवळपास 50 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आले आहे