
अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झाली होती. यावेळी जोरदार वाद दोघांमध्ये बघायला मिळाले.

हेच नाही तर अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसले आणि सतत एकमेकांना भांडताना दिसले.

आता नुकताच अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे अत्यंत रोमंटिक फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये अंकिता साडीमध्ये दिसत आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे हे रोमंटिक फोटो लोकांना अजिबातच आवडले नाहीत. अनेकांनी कमेंट करत थेट म्हटले की, हा ड्रामा बंद करा.

दुसऱ्याने लिहिले की, तुमचे नाते कसे आहे हे आम्हाला पण माहिती आहे. उगाच दिखावा कशासाठी करता तुम्ही. तिसऱ्याने लिहिले की, फक्त नाटकगिरी...