
ड्रेसमुळे तिचे हे फोटो व्हायरल झाले. फोटोंमध्ये अनुष्का खूप ग्लॅमरस अंदाजात दिसतेय. त्यामुळेच ती वादात सापडली आहे. आता अनुष्काने ट्रोलर्सना कडक उत्तर दिलं आहे. सितार वादक अनुष्का शंकरने तिच्या बॉडी शेमिंग विरुद्ध आवाज उठवला आहे.

माझं शरीर दुसऱ्या कोणाचं नाहीय. त्यावर तुम्ही कमेंट करावी. सितार वादक पंडित रविशंकर यांच्या पुत्रीने आपल्या फोटोंची एक सीरीज पोस्ट केली आहे.

यात पुरुष युजर्सनी तिचे कपडे आणि शरीराबद्दल केलेल्या लैंगिक टिप्पण्या सुद्धा अटॅच आहेत. “भारतीय शास्त्रीय संगीत पवित्र संगीत आहे. पण पोषाख मेळ खात नाही" अशी एक कमेंट आहे. "तुम्ही धन्य आहात. पण क्लीवेज दाखवण्याची आवश्यकता नव्हती" असं दुसऱ्या एका कमेंटमध्ये म्हटलय.

12 वेळा ग्रॅमी अवॉर्डसाठी नॉमिनेट झालेल्या अनुष्का शंकरने लिहिलय की, एक प्रकारे हे एक शरीर आहे. यात काही खास नाहीय. दुसऱ्या शरीराप्रमाणे हा सुद्धा एक चमत्कार आहे. "मी विचार करते की, माझ्या शरीराने मला कुठल्या-कुठल्या परिस्थितीतून जाण्यासाठी मदत केली. तेव्हा माझ्या मनात कृतज्ञतेची भावना येते. 44 वर्षीय अनुष्कासाठी तिचं शरीर एक पूर्ण, शक्तीशाली योद्धा आहे"

अनुष्का शंकरने बरच काही लिहिलय. हे तिचं शरीर आहे आणि काय घालायचं हे तिची मर्जी आहे. अन्य कोणाला यावर कमेंट करण्याचा अधिकार नाही.