
अरबाज खानच्या एक्स गर्लफ्रेंडने असे काही केले की, लोकांमध्ये प्रचंड असा संताप हा बघायला मिळतोय. हेच नाही तर लोक जोरदार टीका करताना दिसत आहेत.

जॉर्जिया एंड्रिया ही अरबाज खानची एक्स गर्लफ्रेंड आहे. अनेक वर्षे जॉर्जिया एंड्रिया आणि अरबाज खान यांनी एकमेकांना डेट केलंय.

जॉर्जिया एंड्रिया हिने नुकताच असे काही केले की, तिच्या विरोधात संतापाची लाट ही बघायला मिळतंय. लोक हे जॉर्जिया एंड्रियाला खडेबोल सुनावत आहेत.

जॉर्जिया एंड्रियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक रूम दिसत आहे आणि तिथे 500 रूपयांचा हजारो नोटा या जमिनीवर पडलेल्या दिसत आहेत. या नोटांवर चक्क पाय ठेवताना जॉर्जिया एंड्रिया दिसत आहे.

500 च्या नोटांवर पाय ठेऊन खास पोझ देताना देखील जॉर्जिया एंड्रिया ही दिसत आहे. लोकांनी कमेंट करत याला बोलतात माज असे म्हटले. हेच नाही तर लोक सतत तिच्यावर टीका करत आहेत.