Archana Puran Singh Second Wedding: चूक झाली… वयाच्या 64व्या वर्षी अर्चना पूराण सिंह करणार दुसरे लग्न? होणारा पती कोण?

Archana Puran Singh Second Wedding: अभिनेत्री अर्चना पुराण सिंह ही कायमच चर्चेत असते. सध्या तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. ती दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. आता तिचा होणारा नवर कोण आहे? चला जाणून घेऊया...

| Updated on: Nov 12, 2026 | 10:44 AM
1 / 5
‘पती, पत्नी आणि पंगा’ या शोचा दुसरा सिझन चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोड्या हजेरी लावताना दिसत आहेत. प्रेक्षकांना त्यांची हजेरी प्रचंड आवडत आहे. शोचा टीआरपी टिकवून ठेवण्यासाठी मेकर्स दररोज काहीतरी नवीन करत असतात. आता त्यांनी अर्चना पूरन सिंह आणि परमीत सेठी यांचे पुन्हा लग्न लावण्याची योजना आखली आहे.

2 / 5

अर्चना आणि परमीत यांचे लग्न आम्ही फक्त सांगत नाही आहोत, तर ही चांगली बातमी त्यांनी स्वतः शेअर केली आहे. शोच्या सेटवर पत्रकारांशी बोलताना अर्चना पूरन सिंह म्हणाल्या की आम्हाला दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी पार्टी द्या.

3 / 5

अर्चनाने पुढे सांगितले की १२ डिसेंबरला आम्ही पुन्हा लग्न करत आहोत. कारण जेव्हा आम्ही पहिल्यांदा लग्न केले होते, तेव्हा ते चोरून, लपून-छपून आणि कमी लोकांच्या उपस्थितीत केले होते. त्यानंतर परमीत म्हणतात की चूक झाली. त्यानंतर अर्चना म्हणाली की आम्ही ही चूक पुन्हा करणार आहोत, पण खूप लोकांसमोर.

4 / 5

अर्चना आणि परमीत म्हणाले की यावेळी लग्नाचे सर्व कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडणार आहेत. या सर्व कार्यक्रमात पाहुण्यांना मजा येणार आहे.

5 / 5

अर्चना आणि परमीत यांच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहेत. याआधी मेकर्सनी ‘पती, पत्नी आणि पंगा’ सीझन १ मध्ये अविका गौर आणि मिलिंद चंदवानी यांचे लग्न लावले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us