
या यादीत प्रथम क्रमांकावर आहे साऊथ सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी यांचे नाव येते. नागार्जुन यांची संपत्ती पाहात ते टॉपवर आहेत. एका वृत्तानुसार नार्गाजुन एका चित्रपटासाठी सुमारे २० कोटी रुपये आकारतात.टीव्ही शोच्या एका एपिसोडचे ५ कोटी रुपये घेतात.आणि ब्रँड एंडोर्समेंटसाठी २ कोटीहून अधिक रक्कम आकारतात.त्यांची एकूण संपत्ती ४१० दशलक्ष डॉलर आहे. ( सुमारे ३,५७२ रु. ) या अभिनेत्याकडे अनेक आलिशान कारचे कलेक्शन आहे.

दुसरे सर्वात श्रीमंत स्टार चिरंजिवी आहेत. एका वृत्तपत्रानुसार त्यांची संपती १,६५० कोटी रुपये आहे. चिरंजीवी यांचा हैदराबाद येथे २५,००० चौरस फूटाचा एक बंगला आहे. बंगळुरुत संपत्ती आणि एक खाजगी जेट विमान देखील आहे. त्यांच्याकडे अनेक लक्झरी कार आहेत.

तिसऱ्या नंबरवर आरआरआर स्टार रामचरण यांचे नाव येथे त्यांच्याकडे देखील मोठी संपत्ती आहे. बातम्यानुसार रामचरण यांच्या जवळ १,३८० कोटीची संपत्ती आहे.रामचरण चित्रपट, एंडोमेंट, प्रोडक्शन आणि इन्व्हेस्टमेंटद्वारे भरपूर कमाई करतात. त्यांच्याकडे हैदराबाद येथे एक आलीशान घर असून त्याची किंमत ३८ कोटी आहे.

चौथा नंबरवर तेलगु सिनेमा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आहेत. ते एक हायएस्ट पेड एक्टर आहेत. त्यांच्या संपत्तीचा विचार करतात नेटवर्थ सुमारे ६० दशलक्ष डॉलर ( ५०० कोटी ) आहे. त्यांनी चित्रपट मानधन आणि ब्रँड एंडोर्समेंटमध्येमधून ही कमाई केली आहे. अलिकडेच रिलीज झालेल्या वॉर-२ सिनेमासाठी एनटीआर यांनी ५० कोटीचे मानधन घेतल्याचे म्हटले जाते.

पाचव्या क्रमांकावर अल्लू अर्जुन याचे नाव येते. पुष्पा आणि पुष्पा-२ चित्रपटाद्वारे फेमस झालेल्या या अभिनेत्याने पूष्पा - २ साठी ३०० कोटी रुपयांचे मानधन घेतल्याचे म्हटले जाते. अल्लू अर्जुन भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे स्टार झाले. अल्लू अर्जुन यांची संपत्ती सुमारे ४६० कोटी रुपयांची आहे.

तर साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा विचार करतात श्रीमंतीत त्यांच्या क्रमांक टॉप-६ मध्ये येतो. रजनीकांत यांची नेटवर्थ ४०० ते ४३० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.