43 वर्षांपूर्वीचं लोकगीत, आधी शत्रुघ्न सिन्हांवर चित्रित, आता रणबीरच्या 1000 कोटी कमावलेल्या सिनेमात, जेन-झीचं फेव्हरेट
रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील ‘अर्जन वैली’ गाण्याने तरुणाईला वेड लावलं. हे गाण आता जेन-झीचं फेव्हरेट गाण आहे. पण हे गाणं पहिल्यांदा 2023 मध्ये नाही, तर तब्बल 43 वर्षांपूर्वी एका पंजाबी चित्रपटात झळकलं होतं. या गाण्याचा शत्रुघ्न सिन्हा यांच्याशीही संबंध आहे, चला तर मग जाणून घेऊयात...

अर्जन वैली’ हे पंजाबी लोकगीत तब्बल 43 वर्षे जुने आहे. या गाण्याचा संबंध 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुत्त जट्टां दे’ या पंजाबी चित्रपटाशी आहे.
या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत बलदेव खोसा आणि प्रीत कौर यांच्याही भूमिका होत्या. धर्मेंद्र यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
'पुत्त जट्टां दे’ या चित्रपटात पंजाबमधील ग्रामीण जीवन, जमीन, कुटुंब आणि तिथल्या लोकांच्या संघर्षाचे चित्रण करण्यात आले होते. पंजाबी संस्कृती आणि लोकसंगीत हे या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य होते.
2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटात ‘अर्जन वैली’ गाण्याचा पुन्हा वापर करण्यात आला. गायक भूपिंदर बब्बल यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणे गायले.
‘ॲनिमल’ चित्रपटातील ॲक्शन दृश्यांमुळे या गाण्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. सोशल मीडिया, लग्नसमारंभ आणि पार्ट्यांमध्येही हे गाणे वाजू लागले. विशेष म्हणजे ‘ॲनिमल’ने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.