अखेर युट्यूबर अरमान मलिक करणार व्लॉगिंग बंद; चाहत्यांना बसला धक्का!

प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक व्लॉगिंग बंद करणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत त्यानेच सोशल मीडियावर माहिती दिली आहे. अरमान हा अत्यंत प्रसिद्ध युट्यूबर असून त्याने दोन लग्न केले आहेत.

| Updated on: Aug 13, 2025 | 7:58 AM
1 / 5
प्रसिद्ध युट्यूबर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. आता त्याने थेट व्लॉगिंग बंद करण्याची घोषणा केली आहे. अरमानने दोनदा लग्न केलं असून दोन्ही पत्नींपासून त्याला चार मुलं आहेत. कृतिका आणि पायल मलिक अशी त्याच्या पत्नींची नावं आहेत.

2 / 5
अरमानने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात तो आणि पायल चाहत्यांना सांगतायत की, "मलिक कुटुंब आता व्लॉगिंग बंद करणार आहे." यात अरमान म्हणतो की, "खरंतर आम्हाला आमच्या मुलांच्या  संगोपनावर अधिक लक्ष केंद्रीत करायचं आहे. संपूर्ण वेळ व्लॉगिंगमध्ये निघून जात असल्याने आम्ही मुलांना फारसा वेळ देऊ शकलो नाही."

3 / 5
"मी, पायल आणि कृतिकाने ठरवलंय की आम्ही व्लॉगिंग करणार नाही. फक्त एकच चॅनल सुरू ठेवणार 'मलिक किड्स'चा, ज्यावर आम्ही व्हिडीओ अपलोड करू. मुलांची शाळा सुरू झाली आहे. त्यांचं खाणंपिणं, त्यांना झोपवणं, त्यांचं संगोपन याकडे आम्ही अधिक लक्ष केंद्रीत करणार आहोत", असं अरमान स्पष्ट करतो. त्याला पायलसुद्धा सहमती दर्शवते.

4 / 5
मुलं कशी राहतायत, याविषयी आम्ही त्या नवीन व्लॉगमध्ये अपडेट देत राहू, असंही अरमानने चाहत्यांना सांगितलं आहे.  अरमानचं खासगी आयुष्य हे जणू खुल्या किताबाप्रमाणे आहे. त्याच्या दैनंदिन जे-जे घडतं ते सर्व तो सोशल मीडियावर व्लॉगच्या माध्यमातून शेअर करतो.

5 / 5
अरमानसोबतच पायल आणि कृतिकासुद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. या सर्वांचे वेगवेगळे युट्यूब पेजेस आहेत. या पेजवर ते दररोज नवनवीन व्हिडीओ अपलोड करतात. त्यावर लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळतात. पत्नी आणि मुलांशिवाय अरमान मलिकची स्वत:ची एक मोठी टीम आहे. या टीमपैकी काही जण व्हिडीओ बनवण्याचं आणि काही जण व्हिडीओ एडिट करण्याचं काम करतात.