
अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये पोहोचला. मात्र, पायल मलिक ही घरातून बाहेर पडली. विशाल पांडे याने अरमान मलिकची पहिली पत्नी कृतिका मलिकबद्दल वाईट कमेंट केली आणि शिवानी हिने चुकीचे आरोप केले.

बिग बॉस ओटीटी 3 च्या मंचावर जाऊन याबद्दल विशाल आणि शिवानीला विचारना करताना पायल मलिक ही दिसली. मात्र, तेंव्हापासून विशाल आणि शिवानीचे चाहते पायलला खडेबोल सुनावत आहेत.

हेच नाहीतर पायल हिच्याबद्दल चुकीचे बोलत आहेत. हे सहन न झाल्याने आता पायलने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये पायल मलिक ही ढसाढसा रडताना दिसत आहे.

पायल मलिक ही रडताना म्हणत आहे की, मी चुकीचे काहीच बोलले नाहीये. मी माझ्या कुटुंबाच्यासोबत उभी राहिले. जर कुटुंबाच्या सपोर्टमध्ये थांबणार नाहीतर कोणाच्या थांबणार. मी मरेपर्यंत माझ्या कुटुंबाच्यासोबत असेल.

पुढे पायल म्हणाली की, मला इतके वाईट बोलले जात आहे की, माझी चुकी का आहे? ते दोघेही चुकीचे बोलले होते आणि तेच सांगण्यासाठी मी तिथे गेले होते. आता पायलचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.