Train Cancelled : अर्नब चक्रीवादळाचा धसका! महाराष्ट्रात या रुटवर 4 एक्स्प्रेस रेल्वेगाड्या रद्द

सुरक्षेच्या कारणास्तव नांदेड विभागातील 4 महत्त्वाच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. उद्या म्हणजेच ​28 ऑक्टोबर रोजी धावणारी काकीनाडा ते साईनगर शिर्डी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

| Updated on: Oct 27, 2026 | 10:10 PM
1 / 5
बंगालच्या खाडीत अर्नब चक्रीवादळ आलंय. या चक्रीवादळामुळे विदर्भात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. ओडिसा, आंध्र प्रदेश राज्यात तर रेड अलर्ट देण्यात आलाय.

बंगालच्या खाडीत अर्नब चक्रीवादळ आलंय. या चक्रीवादळामुळे विदर्भात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. ओडिसा, आंध्र प्रदेश राज्यात तर रेड अलर्ट देण्यात आलाय.

2 / 5

दरम्यान, याच चक्रीवादळाची दाहकता लक्षात घेता दक्षिण-मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील चार महत्त्वाच्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

3 / 5

सुरक्षेच्या कारणास्तव नांदेड विभागातील 4 महत्त्वाच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. उद्या म्हणजेच ​28 ऑक्टोबर रोजी धावणारी काकीनाडा ते साईनगर शिर्डी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

4 / 5

यासह 28 ऑक्टोबर रोजी धावणारी नरसापूर ते नगरसुल एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. 29 ऑक्टोबर रोजीची परतीच्या प्रवासातील साईनगर शिर्डी ते काकीनाडा एक्स्प्रेस रेल्वेगाडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

5 / 5

30 ऑक्टोबर रोजी धावणारी संबलपूर ते नांदेड एक्सप्रेसची नियोजित फेरी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊनच प्रवासाचे नियोजन करन्याच रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us