
बिग बॉस 17 च्या घरात नुकताच एक टास्क पार पडलाय. यावेळी मनारा चोप्रा हिच्याबद्दल अत्यंत धक्कादायक असे विधान अरुण माशेट्टी याने केले. ज्यानंतर चाहत्यांमध्ये संताप बघायला मिळतोय.

टास्कमध्ये बोलताना अरुण माशेट्टी हा थेट मनारा चोप्रा हिच्या चेहऱ्याबद्दल कमेंट करताना दिसला. ज्याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

अरुण माशेट्टी हा थेट म्हणाला की, मनारा चोप्रा हिचा चेहरा सडलेला आहे. अरुण माशेट्टी याचे हे बोलणे ऐकून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

आता अरुण माशेट्टी याला हे वाक्य चांगलेच महागात पडताना दिसत आहेत. अरुण माशेट्टी याला सोशल मीडियावर लोक खडेबोल हे सुनावताना दिसत आहेत.

अरुण माशेट्टी हा बिग बाॅस 17 मध्ये दाखल झालाय. लोकांना त्याचा अंदाज हा आवडताना दिसतोय. मात्र, एकीकडे तो घरात फार जास्त धमाका करताना अजिबात दिसत नाहीये.