आधी रिजेक्ट केलेलं गाणं नंतर असं गाजलं की… 30 वर्ष जुनं हे गाणं आजही एकतात लोकं
आशा भोसले यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक गाजलेली गाणी दिली. त्यांच्या आवाजाची खास ओळख आजही कायम आहे. 20 भाषांमध्ये 12,000 पेक्षा अधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांचं जरा सा झूम लूं मैं' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. आशा भोसले आणि अभिजीत यांच्या आवाजामुळे गाण्याला वेगळी ओळख मिळाली.
1 / 5

जरा सा झूम लूं मैं' गाण्याची गोष्ट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'मधील हे गाणे आजही लोकप्रिय आहे. मात्र अंतिम रूप मिळण्यापूर्वी गाण्यावर अनेक प्रयोग करण्यात आले.
2 / 5
सुरुवातीची धून झाली होती रिजेक्ट दिग्दर्शक आदित्य चोप्रांना सुरुवातीची धून पसंत पडली नव्हती. गाण्याची ऊर्जा प्रसंगाशी जुळत नसल्याचे त्यांना वाटले.
3 / 5
रात्री सुचली नवीन धून जतिन पंडित यांना झोपेत असताना नवीन धून सुचली. जागे होताच त्यांनी ती कल्पना रेकॉर्ड करून ठेवली.
4 / 5
आशा भोसले आणि अभिजीतचा आवाज अंतिम गाण्यात आशा भोसले आणि अभिजीत भट्टाचार्य यांचे आवाज होते. आनंद बख्शी यांच्या शब्दांनी गाण्याला चंचल रोमँटिक रंग दिला.
5 / 5
चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' 20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झाला. सुमारे 4 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने मोठे यश मिळवले.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us