
राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि बॉलीवूडचे प्रसिद्ध 'खलनायक' आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरे लग्न केले. आसाममधील रुपाली बरुआ हिच्याशी रजिस्टर मॅरेज केले. त्यांच्या दुसऱया लग्नाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आता आशिष आणि रुपाली यांच्या लग्नाचे फोटो समोर आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आसामी वधूच्या पोशाखात रुपाली बरुआ खूपच सुंदर दिसत आहे. रुपाली बरुआ फॅशन क्षेत्राशी निगडीत असून तिच्याकडे कॅफे आणि फॅशन बुटीक देखील आहे.

आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांनी कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या उपस्थितीत कलकत्ता येथे कोर्ट मॅरेज केले. लग्नानंतर आशिष आणि रुपाली आनंदाने कॅमेरासमोर पोज देताना दिसले.

कोर्ट मॅरेजनंतर आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांनी एका छोट्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये वधू-वरांसह सर्वांनी आनंद लुटला.

लग्नात आशिष विद्यार्थी यांनी वधू रुपाली बरुआसोबत डान्स केला. रुपाली आणि आशिष यांनी आसामचे 'बिहू' नृत्य सादर केले.

रुपाली बरुआ हिला एक मुलगी आहे, तीदेखील या लग्नासाठी उपस्थित होती.

आशिष विद्यार्थी यांचेही हे दुसरे लग्न असून यापूर्वी त्यांचा विवाह राजोशी यांच्याशी झाला होता. त्यांना २३ वर्षांचा एक मुलगा देखील आहे, तो सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे.