खरातच्या जवळच्या व्यक्तीनेच गेम केला! बायकोवर हात टाकला अन्… अख्खं साम्राज्यच केलं उद्ध्वस्त

लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. या भोंदू बाबाने महिलांवर अत्याचार केले. पण हे प्रकरण उघडकीस कसे आले? असा प्रश्न अनेकंना पडला आहे. चला जाणून घेऊया...

| Updated on: Mar 23, 2026 | 2:08 PM
1 / 8
नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी आणि 'कॅप्टन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्यावर लैंगिक छळ आणि बलात्काराचे गंभीर आरोप आहेत. आतापर्यंत त्याच्यावर तीन गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या कथित 'दैवी शक्ती'च्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या या साम्राज्याचा पर्दाफाश झाला आहे. हे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यात मुख्य भूमिका बजावली ती त्याच्या एकेकाळच्या अगदी जवळच्या आणि विश्वासू व्यक्तीने.

2 / 8
पहिला गुन्हा १७ मार्चला दाखल झाला. एका विवाहित महिलेने खरात यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी रात्री उशिरा गुप्तपणे त्याच्या घरावर छापा टाकला आणि अटक केली. राजकीय नेत्यांशी हितसंबंध असलेल्या खरातला अटक करताना पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली होती.

3 / 8
त्यानंतर रविवारी आणखी दोन गुन्हे दाखल झाले. एका घटस्फोटित महिलेच्या तक्रारीवर आधारित गुन्हा तर दुसरा २०२३ मधील एका सात महिन्यांच्या गरोदर महिलेच्या तक्रारीवर आधारित आहे. या घटनांमुळे खरातच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाला आहे.

4 / 8
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, खरातचा पर्दाफाश त्याच्या एकेकाळच्या निस्सीम भक्त आणि जवळच्या ओळखीच्या व्यक्तीने केला. ही व्यक्ती खरातच्या वाईट कृत्यांना साथ देत होती, ज्यामुळे तो सुरक्षित राहिला होता. पण एका घटनेने सगळे बदलले.

5 / 8
२०२३ मध्ये ही व्यक्ती आपल्या सात महिन्यांच्या गरोदर पत्नीला घेऊन खरातकडे आली. प्रसूती सुरक्षित व्हावी आणि बाळाला चांगली संतती मिळावी यासाठी पूजा-विधी करायचे असल्याचे सांगून खरातने या व्यक्तीला केबिनच्या बाहेर बसवले. प्रभावाखाली असलेल्या व्यक्तीने बाहेर जाणे पसंत केले.

6 / 8
पण केबिनमध्ये लाइट बंद करून खरातने त्या गरोदर महिलेवर हात टाकला आणि लैंगिक शोषण केले. बाहेर आल्यानंतर महिलेच्या पतीला हा प्रकार सांगितला गेला. सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण बाळाची शपथ घेतल्यावर सत्य समजले. यानंतर या व्यक्तीने खरातच्या हालचालींवर लक्ष ठेवले.

7 / 8
संशय बळावल्यानंतर त्याने खरातच्या ऑफिसमध्ये छुपे कॅमेरे लावले. केबिनमधील अनेक लैंगिक छळाचे व्हिडीओ त्याने रेकॉर्ड केले. हे व्हिडीओ पेनड्राइव्हमध्ये घेऊन त्याने नाशिक पोलिसांकडे सादर केले. व्हिडीओ पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या पुराव्यांमुळे खरातच्या साम्राज्याला सुरुंग लागला.

8 / 8
पोलिसांनी तपास सुरू केला असून, विशेष तपास पथक (SIT) नेमले गेले आहे. अनेक महिलांचे शोषण झाल्याचे संकेत मिळत असून, अधिक तक्रारी येण्याची शक्यता आहे. खरातच्या या कृत्यांनी अंधश्रद्धा, राजकीय संरक्षण आणि महिलांच्या शोषणाचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. तपास सुरू असून, न्यायाची प्रक्रिया वेगाने पुढे जात आहे.

Follow Us