Ashok Saraf: भाऊ कदम सक्सेसफुल आहे, का? त्याचा चेहरा… अशोक सराफ असं का म्हणाले?
Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ हे कायम चर्चेत असतात. नुकताच त्यांनी एका मुलाखतीमध्ये कॉमेडी किंग भाऊ कदमविषयी मोठे वक्तव्य केले आहे. ते काय म्हणाले चला जाणून घेऊया...

मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेते अशोक सराफ हे कायमच चर्चेत असतात. त्यांच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. लवकरच त्यांचा आदि अनंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेता भाऊ कदम यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अशोक सराफ यांनी कॉमेडी किंग भाऊ कदमचे तोंडभरुन कौतुक केले आहे. ते म्हणाले की, विनोद हा सिरियसलीच करायला पाहिजे. तुम्ही जेव्हा विनोद सादर करता तेव्हा तो नाही पोहोचत.
विनोदातील इनोसन्स टिपला गेला पाहिजे. आता भाऊ कदम सक्सेसफुल आहे, का? असा सवाल अशोक सराफ यांनी केला.
पुढे ते भाऊ कदम विषयी बोलताना म्हणाले की, त्याचा चेहराच इनोसंट आहे. बघा त्याचे डोळे इतके इनोसंट आहे. तो काय नुसता बोलला तरी लोकांना हसायला येईल. हे त्याच्यातले प्लस पॉईंट आहेत.
अशोक सराफ यांनी भाऊ कदमचे कौतुक केले. आता यावर भाऊ कदम काय प्रतिक्रिया देतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच अशोक सराफ यांच्या आदि अनंत या चित्रपटात संकर्षण कऱ्हाडे देखील दिसणार आहे. या चित्रपटात आजोबा आणि नातवाची जोडी पाहायला मिळणार आहे.