
मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार असे आहेत जे आजही आपल्या मातीशी जोडलेले आहेत. हे कलाकार ग्लॅमरच्या दुनियेत जरी असले तरी शेतात राबताना दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीचे फोटो व्हायरल झाले आहेत.

एक मराठमोळी अभिनेत्री गावी जाऊन शेतात घाम गळाताना दिसत आहे. तिचे शेतात राबतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आई कुठे काय करते मालिकेत काम करणारी अश्विनी महांगडे आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

अश्विनी दरवर्षी शेतीच्या कामासाठी गावी जाते. यंदाही ती शेती करण्यासाठी गावी गेली आहे.

सोशल मीडियावर फोटो शेअर करताना अश्विनीने, 'हे फक्त फोटो नाहीत तर यात भावना आहेत' असे कॅप्शन दिले आहे.

अश्विनी शेतामध्ये सोयाबीनचे पिक घेते. या पिकासाठी ती दरवर्षी गावी जाते. शेतात काम करताना अश्विनीच्या हाताला देखील लागले आहे.