‘अस्मिता’मधली ती चिमुकली आठवतेय? आता या लोकप्रिय मालिकेत साकारतेय खलनायिका
हे दशक तिच्यासाठी केवळ एक टप्पा नसून, एक भावनिक आणि प्रेरणादायक प्रवासही आहे ज्यात स्वप्न, आणि प्रामाणिक प्रयत्नांची झळाळी आहे. 'कमळी' या मालिकेतून ती सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका दररोज रात्री 9 वाजता प्रसारित होते.
'अस्मिता'मधील बालकलाकार
Image Credit source: Instagram
-
-
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’मध्ये ‘अनिका’ ही प्रभावी खलनायिका साकारत केतकी कुलकर्णी सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या भूमिकेतील तिचा अभिनय आणि अस्तित्व प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवत आहे.
-
-
कमळी या मालिकेच्या माध्यमातून केतकी तिच्या अभिनय क्षेत्रातील दहाव्या वर्षात पुन्हा एकदा झी मराठीवर झळकत आहे, हा एक विलक्षण योगायोग ठरतोय. तिच्या अभिनय प्रवासाची सुरुवात 10 वर्षांपूर्वी, झी मराठीवरील ‘अस्मिता’ या गाजलेल्या मालिकेतून झाली.
-
-
‘पूजा’ही भूमिका करताना, केतकी पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकली होती. त्या आठवणीबद्दल केतकी म्हणाली, “मी तीन वर्षांची असल्यापासून टीव्हीवर स्वतःला पाहण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि झी मराठीमुळे ते पूर्ण झालं. तेव्हापासून आजवर, मी जवळपास 12 महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये अभिनय केला आहे.”
-
-
“झी मराठी हे माझ्या करिअरचं पहिलं व्यासपीठ ठरलं आणि झी स्टुडिओज अंतर्गत माझा पहिला चित्रपटही प्रदर्शित झाला. लहानपणापासून झी मराठीवरील कार्यक्रम पाहत आली आहे , आज त्या परिवाराचा भाग आहे, ही भावना माझ्यासाठी अतिशय खास आहे,” अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.
-
-
“या 10 वर्षांत मी अनेक चढ-उतार अनुभवले. संघर्ष, नकार, संधींची प्रतीक्षा हे सगळं शिकताना मी कायम पाय जमिनीवर ठेवले. या क्षेत्रात वेळच सर्व खेळ आहे, वाट पाहायची, देवावर विश्वास ठेवायचा, मेहनत करायची की यश नक्की मिळतं”, असं ती पुढे म्हणाली.