
इब्राहिम दाऊद याच्याशी संबंधित असलेल्या रत्नागिरीमधील शेतजमिनीचा पुन्हा एकदा लिलाव करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात ही जमीन लिलावासाठी ठेवण्यात येणार आहे.

या सर्व मालमत्ता SAFEMA कायद्यांतर्गत जप्त करण्यात आल्या असून, या लिलाव प्रक्रियेकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.

या मालमत्तांचा लिलाव येत्या 4 नोव्हेंबरला होणार आहे, या मालमत्तांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुम्बके गावातील 171 चौ.मी. शेत जमिनीचा देखील समावेश आहे.

जानेवारी २०२४ मध्ये याच गावातील चार प्लॉट्सचा लिलाव झाला होता. त्यातील दोन जमिनी या दाऊदच्या आईच्या नावावर होत्या. मात्र त्यावेळी १७१ चौ.मी. जमिनीसाठी तब्बल २.०१ कोटींची बोली लावली गेली, मात्र प्रत्यक्ष व्यवहार फक्त ३.२८ लाखांचाच झाला.

त्यामुळे आता पुन्हा एकदा या जमिनी लिलावात समाविष्ट करण्यात आल्या आहेत, यामध्ये १०,४२० चौ.मी.जमीन राखीव किंमत ९.४ लाख, ८,९५३ चौ.मी. जमीन राखीव किंमत ८ लाख आणि २,२४० चौ.मी. शेतीजमीन राखीव किंमत २.३ लाख एवढी आहे.