Hyundai Mercury: हुंडईची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV, बॅटरी स्वॅपिंगचे भन्नाट तंत्रज्ञान

| Updated on: Nov 28, 2026 | 10:51 AM
1 / 6
1.हुंडई मर्क्युरी ही कंपनीची तिसरी आयोनिक कॉन्सेप्ट कार आहे.या कारची संकल्पना, डिझाइन आणि इंजिनिअरिंग चीनमध्येच केले आहे.या कारचे नाव सूर्यमालेतील बुध ग्रहावरून (Mercury) ठेवण्यात आले आहे.

1.हुंडई मर्क्युरी ही कंपनीची तिसरी आयोनिक कॉन्सेप्ट कार आहे.या कारची संकल्पना, डिझाइन आणि इंजिनिअरिंग चीनमध्येच केले आहे.या कारचे नाव सूर्यमालेतील बुध ग्रहावरून (Mercury) ठेवण्यात आले आहे.

2 / 6

2. हुंडई मरकरी कॉन्सेप्टला शार्क नोज स्टाइलचा फ्रंट लूक दिला आहे. यामध्ये पुढील बाजूस स्लिम एलईडी लाइट स्ट्रिप आहे. बंपरचा खालचा भाग ब्लॅक फिनिशमध्ये आहे. कारला ब्लॅक रूफ आणि ब्लॅक व्हील्स दिले आहेत. मागील बाजूस संपूर्ण रुंदीमध्ये पसरलेला एलईडी लाइट बार आहे.

3 / 6

3. या इलेक्ट्रिक SUV मध्ये लेव्हल 2++ ADAS तंत्रज्ञान आणि स्मार्ट कॉकपिट दिले आहे. कंपनीने अद्याप कारच्या मोटरची क्षमता, बॅटरी पॅक आणि ड्रायव्हिंग रेंज याबाबतची माहिती दिलेली नाही.

4 / 6

4. या कारला बॅटरी स्वॅपिंगची सुविधा. म्हणजेच कारची बॅटरी कायमस्वरूपी फिक्स नसेल. डिस्चार्ज झालेली बॅटरी काढून तिच्या जागी चार्ज केलेली दुसरी बॅटरी बसवता येणार आहे. त्यामुळे चार्जिंगसाठीचा वेळ वाचणार आहे. सध्या अशी सुविधा प्रामुख्याने इलेक्ट्रिक दुचाकीत पाहायला मिळते.

5 / 6

5. बॅटरी तंत्रज्ञानासाठी हुंडईने प्रसिद्ध चिनी कंपनी CATL सोबत भागीदारी केली आहे. Mercury कॉन्सेप्टसोबत कंपनीने अर्थ कॉन्सेप्ट, आयोनिक V आणि इतर मॉडेल्सही सादर केली आहेत. हुंडई मर्क्युरीची विक्री 2027 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

6 / 6

6.हुंडईने मर्क्युरी कॉन्सेप्टच्या बॅटरीची क्षमता, मोटर आउटपुट, एका चार्जमध्ये मिळणारी रेंज आणि चार्जिंग लागणारा वेळ याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.तसेच प्रोडक्शन मॉडेलमध्ये कॉन्सेप्टच्या तुलनेत काही डिझाइन बदल होण्याची देखील शक्यता आहे. कारची किंमतही अद्याप जाहीर केलेली नसली तरी ही कार स्वस्त असणार असल्याचे म्हटले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us