
सध्या आपली लाईफस्टाईल प्रचंड बदलली आहे. फास्टफूड किंवा वेळी अवेळी खाल्ल्याने नागरिकांच्या पोटाच्या समस्या वाढल्या आहेत. यातील एक प्रमुख घटक म्हणजे गहू. कर्करोग तज्ज्ञ डॉ. तरंग कृष्णा यांनी अलीकडेच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

यात त्यांनी केवळ २१ दिवस गहू न खाण्याचे आश्चर्यकारक फायदे सांगितले आहेत. त्यांच्या मते, सध्याचा गहू कसा बदलला आहे आणि तो आरोग्यावर कसा परिणाम करत आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

डॉ. कृष्णा यांच्या म्हणण्यानुसार, आजकाल उपलब्ध असलेल्या गव्हातील ग्लूटेन घटकामुळे अनेक लोकांमध्ये पचनाच्या तक्रारी वाढल्या आहेत. आपले आजोबा-पणजोबा गहू खाऊन ८०- १०० वर्षे जगले, कारण तेव्हाचा गहू सालासह नैसर्गिकरित्या येत होता.

मात्र, आताचा गहू आणि त्याचे बियाणे बहुतांशी जनुकीय सुधारित आहेत, ज्यामुळे त्यातील ग्लूटेन पचनासाठी अधिक जड ठरत आहे. जर तुम्ही गहू आहारातून वगळल्यास आरोग्याला मिळणारे काय फायदे मिळतात हे डॉ. कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे.

यामुळे पचनक्रियेला मोठा आराम मिळतो. हा सर्वात मोठा आणि त्वरित मिळणारा फायदा आहे. जर तुम्हाला पोटफुगी, गॅस आणि आम्लपित्त यांसारख्या सामान्य पचनाच्या समस्या लक्षणीयरीत्या कमी होतात.

तसेच ज्या लोकांना फॅटी लिव्हर आहे, त्यांच्यासाठी ग्लूटेन सोडणे हा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय ठरू शकतो, असे ते सांगतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी गहू शक्य तितका टाळावा, असा सल्ला डॉ. तरंग कृष्णा यांनी दिला आहे. त्यांनी लोकांना त्यांच्या आरोग्याच्या निवडीबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.