19 वर्षांनंतर आला सीक्वेल, वीकेंडला छप्परफाड कमाई; मोडला 8 चित्रपटांचा रेकॉर्ड

14 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत दोन-चार नव्हे तर थेट आठ चित्रपटांना मागे टाकलं आहे. फक्त तीन दिवसांत या चित्रपटाने 80 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे.

| Updated on: Aug 17, 2026 | 8:52 AM
1 / 5
अभिनेता इमरान हाश्मी आणि दिशा पटानी यांच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तब्बल 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या 'आवारापन' या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत छप्परफाड कमाई केली आहे. पहिल्या दोन दिवसांतच 'आवारापन 2'ची कमाई 50 कोटी रुपयांवर पोहोचली होती.

2 / 5
'आवारापन 2'ने दोन किंवा चार नाही तर तब्बल आठ चित्रपटांना मागे टाकत 2026 चा मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. 15 ऑगस्टच्या वीकेंडचाही या चित्रपटाला भरपूर फायदा मिळाला आहे. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 22 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 33.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या दोन दिवसांच्या कमाईचा आकडा 55.97 कोटी रुपयांवर पोहोचला होता.

3 / 5
'आवारापन 2'ला रविवारच्या सुट्टीचाही चांगला फायदा मिळाला असून रविवारी रात्री 10.30 वाजेपर्यंत 26.25 कोटी रुपयांची कमाई झाली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत 'आवारापन 2'ची भारतातील एकूण कमाई 82 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हा चित्रपट अवघ्या तीन दिवसांत सहावा सर्वाधिक वीकेंड ओपनर ठरला आहे. रविवारच्या कमाईनंतर 'आवारापन 2'ने टॉप 3 मध्ये एण्ट्री केली आहे.

4 / 5
'आवारापन 2' या चित्रपटाने 'धमाल 4', 'वेलकम टू द जंगल' आणि 'भूत बंगला' यांसारख्या आठ चित्रपटांना मागे टाकलं आहे. 2026 मधील टॉप 10 वीकेंड ओपनर चित्रपटांमध्ये पहिल्या स्थानी 'धुरंधर 2' (466 कोटी रुपये) आणि दुसऱ्या स्थानी 'बॉर्डर 2' (129.89 कोटी रुपये) आहे.

5 / 5
'आवारापन 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आणखी एक रेकॉर्ड बनवला आहे. फक्त दोनच दिवसांत हा इमरान हाश्मीच्या करिअरमधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. इमरान हाश्मीसाठी हा चित्रपट यशस्वी ठरत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us