
मुळच्या बल्गेरिया येथे जन्मलेल्या बाबा वेंगा यांना आज संपूर्ण जग ओळखते. त्यांनी केलेल्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळेच त्यांनी केलेल्या प्रत्येक भविष्यवाणीकडे जग तेवढ्याच गांभीर्याने पाहेत.

बाबा वेंगा यांचा 1999 साली मृत्यू झाला होता. त्या आज हयात नसल्या तरीदेखील त्यांची आजदेखील चर्चा होते. त्यांची एखादी भविष्यवाणी समोर आली की जगभरात मोठी खळबळ उडते.

बाबा वेंगा यांनी आगामी हजारो वर्षांत नेमकं काय होणार याबाबत सांगून ठेवलं आहे. वेळोवेळी त्यांची भविष्यवाणी समोर येते. सध्या अशीच एक अजब आणि जगाची चिंता वाढवणारी त्यांची भविष्यवाणी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीत जगाचा अंत कधी होणार? याबाबत सांगितले आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार 5079 साली या जगाचा अंत होणार आहे. त्यामुळे आता जगाची चिंता वाढली आहे. भविष्यात काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.