
जगात जे काही प्रसिद्ध भविष्यवेत्ता आहेत, त्यामध्ये बाबा वेंगा यांचा देखील समावेश होतो. बाबा वेंगा यांनी अनेक गोष्टींचं भाकीत वर्तवलं आहे, त्यातील काही घटना खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. 2025 या वर्षासाठी देखील बाबा वेंगा यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

फेब्रुवारीचा महिना आता संपत आला आहे, लवकरच मार्च महिना सुरू होणार आहे. मार्च आणि एप्रिल 2025 या दोन महिन्यांमध्ये काही अनाकलनीय घटना घडू शकतात, असं भाकित बाबा वेंगा यांनी आधीच वर्तवलेलं आहे.

बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये ज्या काही भविष्यवाणी केल्या आहेत, त्याचं पुस्तक देखील समोर आलं आहे. या पुस्तकानुसार 2025 मध्ये जगावर एखादं मोठं संकट येऊ शकतं, असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार मार्च-एप्रिलमध्ये ग्रहांच्या स्थितीमध्ये काही बदल होणार आहेत. या बदलाचा परिणाम हा काही राशींवर नकारात्मक होणार आहे. तर काही राशींवर सकारात्मक होणार आहे.

मेष, मिथून, कर्क, वृषभ आणि कुंभ या पाच राशींच्या लोकांचं भविष्य येत्या दोन महिन्यांमध्ये चमकणार आहे, या दोन महिन्यांमध्ये या राशींच्या लोकांची लॉटरी लागणार आहे.या काळात या राशींची अनेक स्वप्न पूर्ण होऊ शकतात असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.

दरम्यान बाब वेंगा यांनी जसं सकारात्मक भविष्यवाणी केली आहे, तशाच काही नकारात्मक भाकितं देखील वर्तवली आहेत, ज्याची सुरुवात 2025 मध्ये मार्चपासून होईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.

मार्च-एप्रील या काळात पूर्वेकडील देशांमध्ये पुन्हा एकदा सत्ता संघर्ष उफाळून येईल, त्याचा फटका हा पश्चिमेकडील देशाला देखील बसू शकतो, असंही बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.