Baleno की Tata Altroz, कोणती कार 6 लाखात आहे, फूल पैसा वुसल?

भारतात अलिकडे हॅचबॅक कारची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल कंपन्या आता हॅचबॅक कारचे प्रोडक्शन वाढवत आहेत. अलिकडे मारुती सुझुकीची बलेनो आणि टाटा अल्ट्रोझ या हॅचबॅक कारची मागणी वाढली आहे.यात कोणती कार आहे पैसा वसुल ते वाचूयात...

| Updated on: Sep 20, 2026 | 5:47 PM
1 / 9
एकीकडे बलेनोचा चांगला मायलेज, कमी मेटेनन्स आणि भरोसेमंद इंजिनासाठी ओळखली जाते. तर दुसरीकडे टाटा अल्ट्रोझ तिची सॉलिड बिल्ड क्वालिटी, ५ स्टार रेटिंग आणि प्रिमीयम डिझाईनच्या बळावर बाजार टीकून आहेत.

एकीकडे बलेनोचा चांगला मायलेज, कमी मेटेनन्स आणि भरोसेमंद इंजिनासाठी ओळखली जाते. तर दुसरीकडे टाटा अल्ट्रोझ तिची सॉलिड बिल्ड क्वालिटी, ५ स्टार रेटिंग आणि प्रिमीयम डिझाईनच्या बळावर बाजार टीकून आहेत.

2 / 9

सहा लाखाच्या सुरुवातीच्या एक्स शोरुमच्या किंमतीत दोन्ही कारचे बेस वा लोअर मिड व्हेरिएंट्स आहेत.Baleno की Tata Altroz कोणती कार कमी किंमत जास्त फिचर्स, चांगला ड्रायव्हींग आणि पैसा वसुल आहे हे पाहूयात.

3 / 9

मारुती बलेनोत 1.2-लिटरच्या के-सिरीजचे पेट्रोल इंजिन खूपच लोकप्रिय आणि स्मूथ मानले जाते. हे इंजिन ट्रॅफीकमध्ये चालवण्यास सोपे आहे. आणि याची थ्रॉटल रिस्पॉन्स देखील खूप वेगवान आहे. मायलेजच्या बाबती बलेनो सरस आहे. ही कार 20 ते 22 किमी प्रति लिटरचे मायलेज देते.

4 / 9

टाटा अल्ट्रोझ 1.2-लिटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन असून जे शहरातील ड्रायव्हिंगसाठी ठीक आहे. मात्र, रिफाइनमेंटच्या बाबतीत बलेनोहून थोडे मागे आहे. अल्ट्रोझचे मायलेज सुमारे 18 ते 19 किमी प्रति लिटर आहे.

5 / 9

सेफ्टी - सेफ्टी प्राधान्य असेल तर टाटा अल्ट्रोझ मजबूत दावेदार आहे. कारणे ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये अल्ट्रोझला 5-स्टार सेफ्टी रेटिंग आहे. या बजेटमध्ये ही सर्वात सुरक्षित कारपैकी एक मानली जाते.तर याची बॉडी शेल आणि दरवाजाची मजबूती स्पर्श करताच जाणवते.

6 / 9

तर मारुती बलेनो आता पहिल्याहून अधिक सेफ्टी फिचर्स आहेत, सहा एअरबॅग्स ABS सोबत EBD आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्रॅम दिले गेले आहेत. परंतू बिल्ड क्वालिटी आणि क्रॅश रेटिंगच्या बाबतीत टाटा अल्ट्रोझ आजही बलेनोच्या एक पाऊल पुढे आहे.

7 / 9

टाटा अल्ट्रोझचे इंटेरिअर प्रीमियम आहे. याचे ९० डिग्री खुलणारे दरवाजे कारमध्ये चढणे आणि उतरण्यासाठी सोपे करणारे आहेत. अल्ट्रोझचे आसने थोडे जास्त सपोर्ट देते. हीचा डॅशबोर्ड लेआऊट खूप मॉर्डन आहे. मात्र,बलेनोचा रिअर सिट थोडी जास्त कम्पर्ट देते.

8 / 9

रिसेल व्हॅल्यू - भारतात मारुती सुझुकीचे नेटवर्क मोठे आहे. बलेनोचे सर्व्हीसिंग आणि स्पेअर पार्ट्स खूप स्वस्त आणि सहज उपलब्ध मिळतात. चार ते पाच वर्षे वापरुनही तुम्ही बलेनोची रिसेल व्हॅल्यू चांगली मिळते.

9 / 9

टाटाची सर्व्हीस गेल्या काही वर्षात सुधारले आहे. परंतू मेटेनन्सच्या बाबतीत मारुती थोडी पेक्षा टाटा अल्ट्रोझ थोडी महागडी पडू शकते. एकूण पाहाता जास्त मायलेज आणि कमी मेटेनन्स हवे तर बलेनो बेस्ट आहे. आणि मजबूती आणि सुरक्षा प्राधान्य असेल तर टाटा अल्ट्रोझ निवडावी.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us