
पगार कमी असला तरी तुम्हाला बँक पर्सनल लोन देते. मात्र त्यासाठी बँकेच्या काही अटी असतात.

तुमचा पगार कमी असला तरी बँका काही गोष्टी बघून तुम्हाला पर्सनल लोन द्यायचं की नाही ते ठरवतात.

तुमचा पगार कमी असला तरी क्रेडिट स्कोअरकडे लक्ष दिलं जातं. तुमचा क्रेडिट स्कोअर जास्त असेल तर तुम्हाला पर्सनल लोन मिळण्याची शक्यता जास्त आसते. त्यामुळे तुम्हाला पगार कमी असला तरी क्रेडिट स्कोअर चांगला ठेवा म्हणजे तुम्हाला पर्सनल लोन मिळू शकते

तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर तुम्ही हाय क्रेडिट स्कोअर असणाऱ्या व्यक्तीला सह-अर्जदार करू शकता. त्यामुळे बँक तुम्हाला पर्सनल लोन देण्याची शक्यता वाढते.

तुमचा पगार कमी असेल तर तुम्ही कमी रकमेचं पर्सनल लोन घेऊ शकता. कमी किमतीच्या पर्सनल लोनसाठी अर्ज केला तर तुम्हाला ते मिळण्याची शक्यता वाढते.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)