आयुष्य असो वा शेअर बाजार, वॉरेन बफे यांचे हे गोल्डन रुल्स नेहमी करतील चांगभलं

Warren Buffets Golden Rules : प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि उद्योगपती वॉरेन बफेने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आणि शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी काही कानमंत्र दिला आहे. त्यात त्यांनी योग्य गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन केले आहे.

| Updated on: Jun 24, 2025 | 12:16 PM
1 / 6
जर तुम्हाला शेअर बाजारात दीर्घकाळ टिकून राहायचे असेल तर प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि उद्योगपती वॉरेन बफे यांनी युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या आहेत. बफे यांचे हे गोल्डन रुल्स तुम्हाला नक्की यश मिळवून देतील.

2 / 6
'स्वत:मध्ये केलेली गुंतवणूक ही सर्वात चांगली गुंतवणूक असते', असे बफे यांचे प्रसिद्ध वाक्य आहे. त्याचा अर्थ आपण नेहमी काही तर शिकत राहणे गरजेचे आहे. नवनवीन शिक्षण, कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यातून व्यक्तिमत्व घडते. .

3 / 6
"जे तुम्ही करत आहात, ते तुम्हाला अजिबात समजत नसेल तर तीच खरी जोखीम आहे." कोणी सांगितले म्हणून गुंतवणूक करू नका. विना विचार गुंतवणूक करणे फायद्याचे ठरत नाही. तुम्ही स्वतः संशोधन करा, अभ्यास कार मग गुंतवणुकीचा विचार करा, असे बफे सांगतात.

4 / 6
"चांगल्या कंपन्यांना योग्य किंमतीत खरेदी करणे हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत कंपनी स्वस्तात खरेदी करण्यापेक्षा कधीही उत्तमच आहे." असे सांगत बफे म्हणतात त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळापर्यंत फायद्याचे गणित जुळवता येईल.

5 / 6
चांगल्या कंपनीचा शेअर खरेदी केले तर मी ते सहजासहजी विकत नाही. त्या कंपनीचे शेअर मी गाठीशी तसेच ठेवतो, हेच माझे होल्डिंग पॅटर्न आहे. दीर्घकाळ तुम्ही गुंतवणूक तशीच ठेवली तर फायदा नक्की होईल. पण तुम्हाला संयम बाळगावा लागेल.

6 / 6
यशस्वी व्हायचे असेल तर काही ठिकाणी नाही म्हणायला शिका. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गुंतवणूक करण्याची गरज नसते. अशाच ठिकाणी गुंतवणूक करा जिथे तुमचा अभ्यास आहे. तिथल्या गोष्टींची तुम्हाला समज आहे. ज्ञान आहे.