
हॉलिवूडची स्टार गायिका रिहाना आणि तिचा प्रियकर रॉकी लवकरच आई-वडील होणार आहेत. रिहानाने नुकतेच आपल्या बेबीबंपसह आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

सोशल मेडियावरील या फोटोमध्ये रिहाना बॉयफ्रेंड रॉकीसोबत बीचवर चील करताना दिसतं आहे. चाहत्यांकडून या दोघांवरही अभिनंदनाचा वर्षांव सुरु केला आहे.

प्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने स्वतः गर्भवती असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ती सातत्याने आपले बेबी बंप फ्लॉंट करताना दिसून आली आहे. आपल्या हॉट अँड सिझलिंग लुकमधील तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

समुद्र किनाऱ्यावर बॉयफ्रेंड सोबत फिरताना रिहानाने ब्रा अँडमिनीस्कर्ट परिधान केला आहे. यामध्ये तिचा खूपचा जास्त बोल्ड अंदाज दिसत आहे. 33 वर्षीय गायिका शेवटची 2016 मध्ये एका अल्बममध्ये दिसली होती.

गायिका रिहाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली दिसून येते. कायम आपल्या पोस्ट मधून तिचे एकापेक्षा एक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.