
भीमताल हे उत्तराखंडमधील एक सुंदर हिल स्टेशन आहे. लोक अनेकदा गर्मी वाढल्यानंतर या ठिकाणी सुट्टया घालवायला जातात. प्रियंका चोपडाच शहर बरेलीपासून भीमताल फक्त 130 किलोमीटर अंतरावर आहे. बेरलीवरुन तिथे पोहोचायला फक्त तीन ते चार तासांचा वेळ लागतो. ( Credit: Tanaysakunia)

उत्तराखंडमधील हे एक सुंदर हिल स्टेशन आहे. इथे आल्यानंतर पुन्हा माघारी फिरण्याची तुमची इच्छा होणार नाही. इथले तलाव, हिरवळ आणि डोंगर रांगा यांच्या सौंदर्यामध्ये तुम्ही हरवून जालं. ( Credit: Memories Pixels)

ज्यांना शांततेत वेळ घालवायचा आहे, त्यांच्यासाठी भीमताल एक परफेक्ट जागा आहे. इथे इतर शहरांसारखी माणसांची गर्दी, हॉर्नचे आवाज ऐकू येणार नाहीत. तुम्हाला सुंदर तलाव आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येईल. .(Credit: Nisargnirvanaofficial)

भीमताल तळं इथलं मुख्य आकर्षण आहे. इथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. सोबत सनसेटच सुंदर दृश्य डोळयात साठवता येईल. त्याशिवाय तुम्ही इथे नौकुचियाताल, विक्टोरिया बांध, आणि भीमेश्वर महादेव मंदिर सुद्धा पाहू शकता. (Credit: Harsh Swing)

इथे राहण्याचे आणि खाण्या-पिण्याचे तुम्हाला बरेच ऑप्शन मिळतील. ते सुद्धा खूप स्वस्तात. भीमताल नैनीताल पासून खूप जवळ आहे. त्यामुळे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नैनीताल सुद्धा एक्सप्लोर करु शकता. ( Credit:sudhakar_gupta85)