
लिंबू : लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, परंतु असे म्हटले जाते की, लिंबू थेट चेहऱ्यावर लावू नये. लिंबू चेहऱ्याला लावल्यामुळे कधीकधी त्याचे साईडइफेफ्ट देखील दिसून येतात. लिंबाचा वापर करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.

बेकिंग सोडा : हा देखील अनेक प्रकारे त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो, परंतु जर तो फक्त कोरड्या चेहऱ्यावर लावला गेला तर पिंपल्स किंवा डाग येण्याची समस्या उद्भवू शकते. मर्यादेपेक्षा जास्त सोडा लावल्याने तुमच्या चेहऱ्याचा रंग लाल होऊ शकतो.

व्हिनेगर : यामध्ये काही अॅसिड असतात, जे त्वचेच्या संसर्गाचे कारण बनतात. त्यामुळे व्हिनेगर थेट चेहऱ्याला न लावण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

बिअर : अनेक लोक त्वचेला लावण्यासाठी बिअरचा देखील वापर करतात. परंतु बिअरमध्ये असलेल्या ऍसिडमुळे त्वचा कोरडी होऊ शकते. इतकेच नाही तर तोंड धुण्यासाठी बिअरचा वापर केल्यास त्वचेवर जळजळ देखील होऊ शकते. त्यामुळे बिअरचा थेट उपयोग टाळावा.

टूथपेस्ट : डाग आणि मुरुमांपासून आराम मिळवण्यासाठी टूथपेस्ट चांगली मानली जात असली तरी त्याचा जास्त वापर केल्यास त्वचेवर कोरडेपणा येऊ शकतो. जर त्वचा जास्त काळ कोरडी रहिल्यास चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडतात.