Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुण्यात आभाळ फाटलं, एक्सप्रेस वे वरचे हडबडवणारे फोटो, पोलिसांनी गाड्यांना माघारी पाठवलं

Mumbai-Pune Express Way : जून महिन्याचे पहिले तीन आठवडे कोरडे गेल्यानंतर आता पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. मागच्या आठवड्यात सुरु झालेला पाऊस दिवसागणिक अजून तीव्र होत चालला आहे. कालपासून मुंबई-पुणे पट्ट्यात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे.

| Updated on: Jul 06, 2026 | 10:54 AM
1 / 5
 मुंबई-पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुंबई-पुणे रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. पावसाने रौद्र रुप धारण केलं आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

मुंबई-पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुंबई-पुणे रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. पावसाने रौद्र रुप धारण केलं आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

2 / 5

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर उरसे टोल नाक्यावरुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहतोय.रस्त्याला जणू नदीच स्वरुप आल्याचं चित्र आहे. त्यामुळे पोलिसांकडून वाहनांना सुरक्षित स्थळी नेण्यास सांगण्यात येत आहे. सात तासापासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ठप्प आहे.

3 / 5

उरसे टोल नाक्यावरील दृश्य पाहिल्यानंतर नक्कीच प्रवाशांची चिंता वाढेल. कारण हा एक्सप्रेस वे आहे की नदी असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. नॉनस्टॉप पाऊस सुरु असल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे. नदी, नाले, ओढे, धबधबे दुथडी भरुन वाहत आहेत.

4 / 5

मुंबई विभागात मंकी हिल घाट सेक्शनमध्ये दरड कोसळली. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या 16 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर 06 गाड्यांचा मार्ग वळवला आहे. काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट म्हणजेच अलीकडील स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत.

5 / 5

कर्जत–खोपोली दरम्यान रेल्वेमार्गावरील खडीचा थर वाहून गेला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कर्जत–खोपोली दरम्यानची रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.सुदैवाने ही बाब वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us