या चुका टाळा, अन्यथा वेळेपूर्वीच त्वचा दिसू लागेल म्हातारी

| Updated on: Dec 09, 2022 | 1:31 PM

1 / 5
रोजच्या जीवनात आपण आरोग्य आणि त्वचेची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र काही वेळा आपल्याकडून काही चुकाही होऊ शकतात, जे सामान्य आहे. पण या चुका जर सवयीत बदलल्या तर आपली त्वचा निस्तेज दिसू लागते. काही वेळा आपल्या त्वचेवर डार्क स्पॉट्स, डार्क सर्कल्सही दिसू लागतात. काही चुकांमुळे त्वचा वेळेपूर्वीच म्हातारी दिसू लागते.

2 / 5
शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी रनिंग म्हणजेच धावण्याचा व्यायाम उत्तम ठरतो. पण त्याचे प्रमाण जास्त असेल तर त्यामुळे कोलेजन तुटू शकते. कोलेजनचे नुकसान हे त्वचेसाठी चांगले नसते.

3 / 5
साखर हा एक असा पदार्थ आहे, ज्याशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. मात्र याच साखरेचे अतिरिक्त प्रमाणात सेवन केले तर आपले आरोग्य आणि त्वचा दोहोंचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात.

4 / 5
चांगली व शांत झोप झाली तर त्यामुळे आपली त्वचा निरोगी व चमकदार होते. मात्र आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे बरेचसे लोक पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत. यामुळे केवळ आपली त्वचा म्हातारी दिसत नाही तर डोळ्यांखाली डार्क सर्कल्सही येतात.

5 / 5
एखाद्या गोष्टीचे व्यसन लागले तर ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. मद्यपानाचे व्यसन लागले तर तुम्ही वेळेआधीच म्हातारे दिसू लागता. कोणतीही गोष्ट प्रमाणात केली पाहिजे. एखादा पदार्थ खाताना किंवा एखादे पेय पितानाही ठराविक प्रमाणात प्यावे, नाहीतर त्याच्या अतिसेवनामुळे गंभीर परिणाम सहन करावे लागू शकतात.