बिअर शाकाहारी की मांसाहारी? तयार करताना होतो माशांच्या अवयवांचा वापर; काय आहे कारण?
बिअर तयार करण्यासाठी पाणी, बार्ली, माल्टेड बार्ली आणि हॉप्स यांचा वापर होतो. त्यामुळे बिअर शाकाहारी असल्याचे मानले जाते. मात्र, काही कंपन्या बिअर स्वच्छ आणि पारदर्शक करण्यासाठी माशांपासून मिळणाऱ्या पदार्थाचा वापर करतात. नेमका हा पदार्थ कोणता आणि त्याचा वापर का केला जातो?

बिअर बनवण्यासाठी काय वापरतात? : बिअर तयार करण्यासाठी प्रामुख्याने पाणी, बार्ली (जव), माल्टेड बार्ली आणि हॉप्स यांचा वापर केला जातो. त्यामुळे सामान्यतः बिअर शाकाहारी असल्याचे मानले जाते.
माशांच्या अवयवांचा वापर: काही बिअर कंपन्या बिअर स्वच्छ आणि पारदर्शक करण्यासाठी 'इजिंग्लास' (Isinglass) या पदार्थाचा वापर करतात. हा पदार्थ माशांच्या स्विम ब्लॅडरपासून म्हणजेच पोहण्याच्या पिशवीपासून मिळवला जातो.
बिअरमध्ये इजिंग्लास का वापरतात? बिअरमधील अनावश्यक कण वेगळे करून ती स्वच्छ आणि चमकदार करण्यासाठी इजिंग्लासचा वापर केला जातो. या प्रक्रियेमुळे बिअर कमी वेळेत तयार करण्यास मदत होते.
इतर प्राणिजन्य घटकांचाही वापर: काही पेयांमध्ये जिलेटिन, अंड्याच्या पांढऱ्या भागापासून तयार होणारे अल्ब्युमिन किंवा डुकरापासून मिळणारे पेप्सिन यांसारख्या घटकांचा वापर केला जाऊ शकतो.
प्रत्येक बिअर मांसाहारी नसते: सर्व कंपन्या बिअर तयार करताना या पद्धतीचा वापर करत नाहीत. काही कंपन्या प्राणिजन्य घटकांचा वापर टाळतात. त्यामुळे बिअर शाकाहारी आहे की मांसाहारी, हे तिच्या उत्पादन प्रक्रियेवर अवलंबून असते.