
रक्तवाढीस मदत – बीटरूटमध्ये लोह (iron) अधिक प्रमाणात असते, जे महिलांमध्ये होणाऱ्या रक्ताल्पतेवर (anemia) प्रभावी उपाय ठरते.

हॉर्मोन संतुलन राखते – बीटरूटमधील अँटीऑक्सिडंट्स आणि पोषकद्रव्ये स्त्रियांमध्ये हार्मोनचे संतुलन राखण्यास मदत करतात.

पीरियड्स दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करतात – बीटरूटमधील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना व सूज कमी करतात.

उर्जेचा स्तर वाढवते – बीटरूटमध्ये नायट्रेट्स असतात, जे शरीरातील रक्तप्रवाह सुधारून थकवा दूर करतात व ऊर्जा वाढवतात.

हृदयाचे आरोग्य सुधारते – बीटरूट ज्यूस मधील घटक रक्तदाब कमी करण्यात मदत करतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.

पचनसंस्था सुधारते – बीटरूटमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात, जे पचनक्रिया सुधारण्यात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यास मदत करतात.