
रंगांची उधळण करणारा होळीचा सण लवकरच येणार आहे. या सणासाठी वापरल्या जाणाऱ्या रंगांमुळे केस आणि त्वचा दोघांचेही नुकसान होते. पण आत्तापासूनच केसांची निगा राखण्यासाठी काही टिप्स पाळल्या तर सणाच्या दिवशी केस कोरडे आणि निर्जीव होण्यापासून वाचू शकतात.

केसांना तेल लावणे : रंगामुळे केस कमकुवत होऊ लागतात. आधीच कमकुवत केसांना अधिक नुकसान सहन करावे लागते. तेलाने मसाज करण्याच्या पद्धतीमुळे केसांची मुळे मजबूत होतात. म्हणूनच आठवड्यातून किमान तीनदा केसांना तेल लावणे आवश्यक आहे. होळी खेळण्यापूर्वीही केसांना नीट तेल लावा.

हेअर मास्क : शांपू आणि कंडिशनर केसांची चांगली काळजी घेतात, पण तेवढेच पुरेसे नाही. आजच्या काळात केसांची काळजी घेण्यासाठी अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्याद्वारे हेअर मास्क तयार करता येतात. त्याचा वापर तरूर करा.

शांपू आणि कंडिशनर : केसांची काळजी घेण्यासाठी शांपू लावणे सर्वोत्तम आहे, परंतु बहुतेक लोक त्यानंतर कंडिशनर वापरणे टाळतात. कंडिशनर हे एक प्रकारचे साधन आहे जे केसांना चमकदार आणि मऊ बनवते.

भरपूर पाणी प्यायलाच हवं : पाण्याशिवाय जीवन काही नाही, पण तरीही लोकांना दररोज जास्त पाणी पिण्याची सवय नसते. आरोग्यासोबतच त्वचा आणि केस दोघांसाठीही पाणी आवश्यक आहे. केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दररोज किमान 3 लिटर पाणी प्या.