पापलेट शारीरास किती लाभदायक, महिलांना देखील होतील अनेक फायदे

पापलेट लोकप्रिय माशांपैकी एक आहे... पापलेट याला 'सरंगा' असं देखील म्हणतात. करडा किंवा रुपेरी, पांढरा आणि काळा असे तीन प्रकारचे पापलेट असतात. महिलांसाठी देखील पापलेट लाभदायक असतात. तर जाणून घ्या पापलेटचे काय उपयोग आहेत...

| Updated on: Nov 19, 2025 | 11:39 PM
1 / 5
पापलेटमध्ये सहज पचणारे उच्च दर्जाचे प्रथिन असते, जे शरीराच्या वाढीस व स्नायूंच्या दुरुस्तीस मदत करते. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयुक्त.

2 / 5
पापलेट मासा तुलनेने कमी तेलकट असल्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य मानला जातो. व्हिटामिन D व B12 चं प्रमाण अधिक प्रमाणात असतं. ज्यामुळे हाडे मजबूत ठेवणे, मेंदूचे कार्य सुधारणा आणि रक्तनिर्मितीसाठी मदत होते.

3 / 5
पापलेटमध्ये आयोडीन, सेलेनियम, फॉस्फरस यांसारखी खनिजे शरीराच्या चयापचयासाठी उपयुक्त ठरतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी पापलेट मासा चांगला ठरतो. त्यातील ओमेगा-३ व जीवनसत्त्वे डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यास मदत करतात.

4 / 5
गर्भवती महिलांसाठी देखील पापलेट मासा पोषक आहे. त्यामध्ये उच्च दर्जाचे प्रथिन, ओमेगा-3 आणि आवश्यक खनिजे गर्भाच्या मेंदू व स्नायू विकासासाठी मदत करतात. पण ते योग्य प्रमाणात खाल्यास फायदेशीर ठरते.

5 / 5
हार्मोनल संतुलनास मदत होते. पापलेटमधील पोषक घटक शरीराची हार्मोनल कार्ये नियमित ठेवण्यास मदत करतात. महिलांमध्ये वाढणाऱ्या हार्ट डिसीजच्या जोखमीसाठी ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स संरक्षणात्मक ठरतात.