सोमवारी मोती, तर शुक्रवारी हिरा; कोणत्या दिवशी कोणते रत्न घालावे? जाणून घ्या

भारतीय ज्योतिषशास्त्रात रत्न धारण करणे महत्त्वाचे आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार योग्य दिवशी रत्न धारण केल्यास जीवनात सुख-समृद्धी येते, समस्या दूर होतात. आत्मविश्वास, मनःशांती वाढते.

| Updated on: Nov 10, 2025 | 4:06 PM
1 / 10
भारतीय ज्योतिषशास्त्रात रत्न धारण करण्याला विशेष महत्त्व असते. ग्रहांची स्थिती आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील समस्या लक्षात घेऊन रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो.

2 / 10
योग्य दिवशी आणि योग्य विधीने धारण केलेले रत्न जीवनात सुख-समृद्धी आणून समस्या दूर करतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार आठवड्याच्या कोणत्या दिवशी कोणते रत्न धारण करणे सर्वात शुभ ठरते, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

3 / 10
रविवार हा ग्रहांचा राजा मानला जाणाऱ्या सूर्य ग्रहाचा दिवस आहे. या दिवशी माणिक रत्न धारण केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. त्याला समाजात मान-सन्मान मिळतो. सरकारी नोकरी आणि राजकारणातील लोकांसाठी हे रत्न अत्यंत शुभ मानले जाते.

4 / 10
सोमवार हा चंद्र ग्रहाशी संबंधित आहे. मोती हे चंद्राचे रत्न असल्यामुळे या दिवशी ते धारण केल्यास मन शांत राहते. यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. तसेच मानसिक तणाव कमी होतो.

5 / 10
मंगळवारचा स्वामी मंगळ आहे. लाल मूंगा (Red Coral) धारण केल्याने व्यक्तीमध्ये साहस, ऊर्जा आणि शारीरिक बळ वाढते. तसेच भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढतो.

6 / 10
बुधवार हा बुध ग्रहाचा दिवस आहे. या दिवशी पन्ना (Emerald) धारण केल्यास बुध ग्रहाची सकारात्मक ऊर्जा त्वरित मिळते. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते. तसेच व्यवसायात प्रगती होते.

7 / 10
गुरुवार हा बृहस्पती म्हणजेच गुरू ग्रहाचा दिवस आहे. पुखराज (Yellow Sapphire) धारण केल्याने ज्ञान, धर्म आणि समृद्धी वाढते. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी हे रत्न प्रभावी ठरते.

8 / 10
शुक्रवार शुक्र ग्रहाशी संबंधित आहे, जो प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक आहे. या दिवशी हिरा (Diamond) धारण केल्याने जीवनात सुख-वैभव आणि शांतता येते.

9 / 10
शनिवार हा कर्म दाता शनि ग्रहाचा दिवस आहे. नीलम  (Blue Sapphire) धारण केल्याने व्यक्तीला शनि ग्रहाची सकारात्मकता प्राप्त होते. यामुळे एकाग्रता, शिस्त आणि चुनौत्यांचा सामना करण्याची शक्ती मिळते.

10 / 10
(टीप -  रत्न धारण करण्यापूर्वी आपल्या कुंडलीचे विश्लेषण करून तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे रत्न धारण करण्यापूर्वी काळजी घ्यावी.)